प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रफळ नसेल तर मोजणी नकाशा आवश्यक नाही

प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रफळ नसेल तर मोजणी नकाशा आवश्यक नाही

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर: 11मे
खरेदी/विक्री होणाऱ्या शेतजमिनीचे क्षेत्रफळ प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी नसेल तर त्या दस्ताला मोजणी नकाशा जोडण्याची आवश्यकता नाही. दस्तामध्ये मिळकतीचे ओळख पटण्याइतपत पुरेसे वर्णन नमूद करावे लागते, याबाबतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे आतापर्यंत दस्ताऐवज नोंदणीसाठी जी कागदपत्रे आवश्यक ठरत होती, ती कागदपत्रे सध्या देखील आवश्यक आहेत त्या कागदपत्रांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही अशी माहिती सह जिल्हा निबंधक वर्ग -1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्यातर्फे सांगण्यात आले आहे.