सहावीत शिकणा-या विद्यार्थीनीवर शिक्षकांकडून अत्याचार 12 वर्षाची विद्यार्थीनी राहली गर्भवती.

47

सहावीत शिकणा-या विद्यार्थीनीवर शिक्षकांकडून अत्याचार 12 वर्षाची विद्यार्थीनी राहली गर्भवती.

सहावीत शिकणा-या विद्यार्थीनीवर शिक्षकांकडून अत्याचार 12 वर्षाची विद्यार्थीनी राहली गर्भवती.
सहावीत शिकणा-या विद्यार्थीनीवर शिक्षकांकडून अत्याचार 12 वर्षाची विद्यार्थीनी राहली गर्भवती.

✒MVN क्राईम रिपोर्टर✒
जयपूर,दि.11 जुन:- राजस्थानातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही घटना राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात घडली आहे. एका माध्यमिक शाळेच्या दोन शिक्षकांनी मिळून एका सहाव्या वर्गात शिक्षण घेणा-या विद्यार्थीनीवर बलात्कार केला. या घटनेमुळे संपूर्ण राजस्थान हादरलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित घटना ही जोधपूरच्या मोकमगढ भागातील एका सरकारी शाळेत घडली आहे. पीडितेची अचानक तब्येत बिघडली. तिला रुग्णालयात दाखल केलं. तिथे तपासणी केल्यानंतर जी माहिती समोर आली त्याने तिच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यामागील कारण म्हणजे इयत्ता सहावीत शिकणारी विद्यार्थीनी गर्भवती होती. तिच्या कुटुंबियांनी तिला विश्वासात घेऊन चर्चा केली. यावेळी तिने रडत आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कुटुंबियांना माहिती दिली.

मुलगी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शाळेत गेली होती. तिथे तिच्या दोन शिक्षकांनी तिला गोड बोलून एका खोलीत नेले. त्यानंतर किळसवाणं आणि संतापजनक कृत्य केले. आरोपी शिक्षक एवढ्यावरच थांबले नाहीत तर नापास करु अशी भीती दाखवून आरोपींनी तीन ते चार वेळा तिच्यावर बलात्कार केला. याशिवाय कुणालाही याबाबत न सांगण्याचे बजावले, अशी माहिती पीडितेने कुटुंबियांना दिली.

संबंधित सर्व प्रकार समजून घेतल्यानंतर पीडितेच्या वडिलांची तळपायाची आग मस्तकात शिरली. त्यांनी थेट पोलीस ठाणे आरोपींविरोधात तक्रार केली. पोलिसांनी देखील विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने आरोपी शिक्षकांविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. मात्र, या घटनेमुळे संबंधित परिसरासह संपूर्ण राजस्थान राज्य हादरलं आहे. आरोपी शिक्षकांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता वाढू लागली आहे.