बीड जिल्ह्यात पुन्हा बिबट्याची आला, एका शेतकऱ्यावर हल्ला, दहशतीचे वातावरण.

✒️श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी✒️
बीड,दि.11 जुन:- बीड जिल्हातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीड जिल्ह्यात बिबट्याने शिरकाव केल्याची माहिती समोर आली असून, नेकनूरच्या दक्षिणेस असलेल्या आठ किलोमीटरवरील कळसंबर परिसरात उसाच्या शेतात बिबट्या आढळून आला आहे. त्यानंतर काही तासातच बिबट्याने एका शेतकर्यावर हल्ला केल्याचे समोर आले आहे. बिबट्याने हल्ला केलेला शेतकरी गंभीररित्या जखमी झाला असून त्यावर नेकनूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
गोरख वाघमारे यांच्या ऊसाच्या शेतात शुक्रवारी कळसंबर येथील बिबट्या दिसून आढळून आला असल्याचे बोलले जात आहे. बिबट्या आला असल्याची माहिती समजताच बघता बघता या ठिकाणी गावातील मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान, बिबट्या दिसल्याची माहिती देखील पोलिसांन देण्यात आली होती. पोलिसांना माहिती मिळाल्याने लागलीच नेकनूर ठाण्याचे सपोनि.लक्ष्मण केंद्रे, पोशि.खाडे, खांडेकर, डोंगरे यांनी घटनास्थळाकडे धाव घेत गर्दी पांगवली. त्यानंतर उसातील ठसे पाहून वन विभागाला संपर्क केला. वन विभागाचे वनाधिकारी अमोल मुंडे, दिनेश मोरे, अच्युत तोंडे हे शेतात दाखल झाले. त्यांनी उसाच्या शेतातील ठसे पाहून त्यावरून तो बिबट्या असल्याचे ओळखले.