सोशल माध्यमांत व्हिडिओ अपलोड करण्यावरुन सुरु झाला वाद, प्रेमीकेला जिवंत जाळल.

50

सोशल माध्यमांत व्हिडिओ अपलोड करण्यावरुन सुरु झाला वाद, प्रेमीकेला जिवंत जाळल.

सोशल माध्यमांत व्हिडिओ अपलोड करण्यावरुन सुरु झाला वाद, प्रेमीकेला जिवंत जाळल.
सोशल माध्यमांत व्हिडिओ अपलोड करण्यावरुन सुरु झाला वाद, प्रेमीकेला जिवंत जाळल.

MVN क्राईम रिपोर्टर✒
तिरुअनंतपुरम,दि11 जून :- केळल राज्याच्या तिरुअनंतपुरम मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तिरुअनंतपुरम येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहाणाऱ्या एका तरुणाने आपल्या प्रेमीकेला जिवंत जाळल्याची खळबळजनक घटनेमुळे सर्वीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत 28 वर्षीय तरुणीचा दुर्दवी मृत्यू झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार इन्स्टाग्राम या सोशल माध्यमांत आपला व्हिडिओ अपलोड करण्यावरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला. हा व्हिडिओ त्या मुलीने स्वताःच बनवला होता. या वादाचे पर्यावसन हे या खळबळजनक घटनेत होईल यांची तिला जाणीव पण नव्हती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी 8 जूनला या दोघांमध्ये वाद झाले, या वादानंतर मुलाने आपल्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणा-या
प्रेमीकेला पेटवून दिलं. गुरुवारी तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला.

ही धक्कादायक घटना केरळमधील असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्लम जिल्ह्यातील अंचलमध्ये 28 वर्षीय आथिरा अथिराला तिच्या लिव्ह इन पार्टनरनं पेटवून दिलं. हे दोघं बऱ्याच काळापासून एकत्र राहात असून त्यांना तीन महिन्यांचं एक बाळही आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करण्यावरुन वाद झाला. यात शानवासनं आथिरावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिलं.

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आथिराचा ओरडण्याचा आवाज ऐकला. बाहेर येऊन पाहिलं असता आथिरा घरातून बाहेर पळत होती आणि तिला आग लागली होती. सर्वांनी मिळून तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान गुरुवारी तिचा मृत्यू झाला. यादरम्यान आरोपीही जखमी झाला होता, त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केलं. आथिराच्या आईच्या तक्रारीनंतर शानवासविरोधाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणीनं प्रियकराविरोधात शारिरीक आणि लैंगिक शोषणाचा आरोप करत आपल्याला एक महिना फ्लॅटमध्ये बंधक बनवून ठेवल्याचं म्हटलं होतं. या तक्रारीनुसार, पोलिसांनी 8 एप्रिलला गुन्हा दाखल केला होता. यानंतर आरोपी मार्टिन जोसेफ फरार झाला होता. पोलिसांनी सांगितलं, की या आरोपीनं महिलेकडून पाच लाख रुपयेही बळकवले होते.