कल्याणमध्ये इराणी टोळीचे पाच चोराना पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

53

कल्याणमध्ये इराणी टोळीचे पाच चोराना पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

कल्याणमध्ये इराणी टोळीचे पाच चोराना पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
कल्याणमध्ये इराणी टोळीचे पाच चोराना पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

अभिजित सपकाळ, मुंबई प्रतिनिधी ✒
ठाणे/कल्याण:- आज काल मुंबईत आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रमाण वाढले आहे त्यात इराणी टोळीचे चोरट्या पण मोठ्या प्रमाणात सक्रीय असल्याचे समोर येत आहे. कधी पोलीस असल्याची बतावणी करून तर कधी वृद्धांना हेरून त्यांचे दागिने चोरणारी कल्याणच्या आंबिवली येथील सराईत गुन्हेगारांची टोळी घाटकोपर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून घाटकोपर परिसरात केलेल्या गुन्ह्यातील मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

विद्याविहार पश्चिमेकडे एका वृद्ध महिलेला पोलीस असल्यास सांगून दोघा इराणी टोळीच्या चोर भामटय़ांनी त्यांच्या सोन्याच्या बांगडय़ा शिताफीने काढून घेऊन तिथुन पलायन केले होते. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मैत्रानंद खंदारे, उपनिरीक्षक मोहन जगदाळे व पथकाने गुह्याचा तपास सुरू केला. आरोपी हे कल्याणच्या आंबिवली येथे राहणारे तसेच पोलीस असल्याची बतावणी करून तसेच सोनसाखळी चोरणारे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी आंबिवली परिसरात सापळा रचला. त्यानंतर एका आरोपीला गुन्ह्यात वापरलेल्या स्कुटीसह पकडण्यात आले. त्याच्याकडून सोन्याची बांगडी हस्तगत करण्यात आली. त्यानंतर त्याचे दोन साथीदार घाटकोपर येथे आले असल्याचे कळताच त्यांनादेखील अटक करण्यात आली. त्यातील एकाकडून 75 ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आले. हे तिन्ही आरोपी रेकॉर्डवरचे असून एका आरोपीवर 37 तर दुसऱ्या आरोपीवर 31 गुन्ह्याची नोंद आहे.