भूखंड झाला श्रीखंड, कळमेश्वर नगरपालिकेच्या जमिनीची परस्पर विक्री फेरफार न केल्याने झाला घोळ.

57

भूखंड झाला श्रीखंड, कळमेश्वर नगरपालिकेच्या जमिनीची परस्पर विक्री फेरफार न केल्याने झाला घोळ.

भूखंड झाला श्रीखंड, कळमेश्वर नगरपालिकेच्या जमिनीची परस्पर विक्री फेरफार न केल्याने झाला घोळ.
भूखंड झाला श्रीखंड, कळमेश्वर नगरपालिकेच्या जमिनीची परस्पर विक्री फेरफार न केल्याने झाला घोळ.

✒युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
कळमेश्वर,दि.11 जुन:- कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषद ने 1985 मध्ये एक लाख 50 हजार रुपये भावाने हेक्‍टर 26 आर जमीन खरेदी केली होती मात्र त्या जागेचे मालकीहक्क फेरफार केलेले नाही. नेमका याचाच फायदा घेत मूळ मालकाने त्या जमिनीचा काही भाग दुसऱ्याला परस्पर विकण्याचा प्रकार नुकताच उघडीच झाला आहे.

कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषद ने विकास कामासाठी सन 1985 मध्ये हेक्‍टर 26 आर जमीन खरेदी केली होती परंतु खरेदी विक्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पालिका प्रशासनाने त्यावेळी जमिनीचे फेरफार करून त्यावर मालकी हक्काचे नोंद केली नाही. त्यामुळे विक्री झाल्यानंतरही ही जमीन मूळ मालकाच्या नावाने राहिली ही बाब लक्षात येताच मालकाने पालिका प्रशासनाला सूचना न देता 2020 मध्ये यातील 30 आर जागेची परस्पर विक्री केली ही विक्री झाल्यानंतर प्रकरण उघड झाले या जागेची विक्री करतेवेळी मालकाने नगरपरिषदेचे ना हरकत प्रमाणपत्र देखील घेतलेले नाही त्या जागेची विक्री ना हरकत प्रमाणपत्र विना करण्यात आली. दुय्यम निबंधककाने पालिकेच्या ना हरकत प्रमाणपत्र विना विक्री करून दिल्याने याप्रकरणात त्यांचाही कार्यप्रणालीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत मुख्य कार्यपालन अधिकारी अस्मिता काळे यांना विचारले असता आठ दिवसा अगोदर हा प्रकार उघड झालेला आहे. याबाबत चौकशी करीत आहोत. सिटीसर्वेची आपली पत्रिका मिळाल्याने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर कळमेश्वर तहसीलदार सचिन यादव नगर परिषद ब्राह्मणी सध्या संबंधित फेरफार घेतला नसल्याने याबाबत चौकशी सुरू आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर योग्य निर्णय घेऊ. दुय्यम निबंधकांना याबाबत विचारणा केली जाईल तहसीलदार सचिन यादव यांनी सांगितले.