रयत क्रांती संघटनेचे नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्याचे आंदोलन.

69

✒अमरावती जिल्हा प्रतिनिधी✒
अमरावती/नांदगाव खंडेश्वर,दि.11 जुन:-
रयत क्रांती संघटनेचे नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन माननीय आमदार तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांचे मार्गदर्शनानुसार आज नागझिरी येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान महाविकास  आघाडी चा पुतळा तयार करून त्याला दुधाने अभिषेक करून चाबकाचे फटके देण्यात आले महाविकास आघाडी सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असून दूध उत्पादक शेतकरी आज हवालदिल झालेला आहे. त्यामुळे दूध डेरी व दूध उत्पादक संघ यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरून दुधाचे भाव 10 ते 12 रुपयांनी कमी केले याचा निषेध म्हणून आजचे आंदोलन अमरावती जिल्हाध्यक्ष एडवोकेट आशिष वानखडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या आंदोलनाला तालुक्यातील तालुकाध्यक्ष ज्ञानेश उगले, जिल्हा उपाध्यक्ष धीरज भाऊ सोळंके, प्रशांत भाऊ जिरापुरे, दिनेश पवार, संतोष गिरी, गौतम गवळी, श्रीकृष्ण गवळणी, गजानन भाऊ चौधरी, निलेश भाऊ पांडे, मोहन भाऊ मेश्राम आदी उपस्थित होते.

संकलन एडवोकेट वानखडे