बीड जिल्हात शेततळ्यात बुडुन बापलेकासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा पसरली.

✒️श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी✒️
बीड,दि.11 जुन:- बीड जिल्हातील गेवराई तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बापलेकासोबत अजून एकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे सर्वीकडे हयगय व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारला पाच वाजताच्या सुमारास ही दुर्दवी गेवराई तालुक्यातील दैठण येथे ही घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
गेवराई तालुक्यातील दैठण येथे सुनील जगन्नाथ पंडित वय 42 वर्ष त्यांचा मुलगा राज पंडित वय 12 वर्ष आणि मयत सुनील पंडित यांच्या पत्नीचा भाचा आदित्य पाटील वय 10 वर्ष रा. शेवगाव असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. गेवराई येथे मृत सुनील पंडित यांचा चार चाकी वाहन खरेदी विक्री फायनान्स व्यवसाय होता. ते मागील काही वर्षांपासून शहरात वास्तव्यास होते. त्याचदरम्यान सुनील पंडित हे गुरुवारी दुपारी मुलगा राज आणि भाचा आदित्य आपल्या घरी आलेल्या छोट्या पाहुण्याला घेऊन सुनिल पंडित गावाकडच्या शेतात गेले. शेतात शेततळं पाहिल्यानंतर मुलांचा आनंद गगनात मावेना. त्यांनी पोहण्याचा नाद धरला. मग सुनिल पंडित यांचा 12 वर्षांचा मुलगा मुलगा आणि पत्नीचा भाचा 10 वर्षीय आदित्य शेततळ्यात पोहोण्यासाठी उतरले. ते दोघे पाण्यात बुडत असल्याचे पाहून सुनील पंडित यांनी त्या दोघांना वाचवण्यासाठी शेततळ्यात उडी मारली. आणि दोघांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न त्यांनी केले. परंतु शेततळ्याच्या अस्तरीकरणावरून पाय घसरत असल्याने त्यांना वरती येण्यासाठी सहारा न मिळाल्यामुळे तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच तलवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने तिघांचेही मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. याठिकाणी मोठी गर्दी झाली होती. या घटनेमुळे संपूर्ण दैठण तालुक्यात शोककळा पसरली होती.