वाघाच्या हल्ल्यात शेतकर्‍याचा मृत्यू

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो.न; 8830857351

गुरे चारण्यासाठी जंगलात गेलेल्या शेतकर्‍यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना शुक्रवार, 10 जून रोजी दूपारी 1 वाजताच्या सुमारास तालुक्यातील पडझरी येथील वनविभागाच्या बफर झोन क्षेत्रात घडली. प्रमोद झुंगाजी मोहुर्ले (42, रा. पडझरी) असे मृतकाचे नाव आहे.

प्रमोद मोहुर्ले हे नेहमीप्रमाणे तालुक्यातील भादुर्णी जवळ असलेल्या पडझरी येथील वनविभागाच्या बफर झोन क्षेत्रात स्वत:च्या मालकीची गुरे चारण्यासाठी गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती कळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पडझरी हे गाव बफरझोन क्षेत्रात येत असून या परिसरात वाघाचे हल्ले होत आहे. त्यामुळे वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकर्‍यांनी वनविभागाकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here