पाचोरा तालुक्यात गाळण बुः मध्ये पहिल्याच पावसाने घेतला शेतकऱ्याचा बळी 

ईसा तडवी

पाचोरा तालुका प्रतिनिधी

मो. 9860884602

दिनांक 9/6/ 2022 रोजी सांयकाळी 6 वाजेच्या सुमारास वीजेच्या कडकटासह पहिला पावसातच गाळण बु: येथील कैलास बारकु पाटील वय 46 वर्षे शेतात कपाशी लावणी साठी काम सुरु असताना सुमारास वादळ आणि पावसासह वीजेचा कडकडाट सुरू झाला. कैलास पाटील यांच्या बाजूलाच अचानक वीज पडल्याने कैलास बारकु पाटील हे शेतातच मृत्युमुखी पडले.

पाचोरा गाळण रसत्यावर आणि शेतशिवारत अनेक झाडे वादळामुळे पडले असुन काही ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत. कैलास पाटील हे सकाळपासुन स्वपत्नीसह शेतात गेले होते. अचानक वारा आणि पाउस सुरु झाल्यामुळे त्यांची पत्नी काही अंतरावर शेतातील झाडाखाली उभ्या होत्या. पण काळाचा घाला कैलास पाटील यांच्यावर आला!पत्नीसमोर पतीचा मृत्यु झाला. नंतर कैलास पाटील यांना पाचोरा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मृत घोषीत केले.

मयत कैलास पाटील याच्यां पश्चात पत्नी तीन मुली असुन तीनही मुलीच लग्न झाले असुन एक मुलगा नाशिक येथे शिक्षणासाठी गेलेला आहे.काळाने अचानक घाला घातल्यानंतर पाटील यांच्या परिवारात अतिशय दुखःद घटना घडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here