ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव हरे येथे कायमस्वरूपी डॉक्टर मिळावा शालिग्राम मालकर यांची मागणी… 

 

ईसा तडवी

पाचोरा तालुका प्रतिनिधी

मो. न: 9860884602

पाचोरा : – दि.09 जून 2022 रोजी राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष शालिग्राम मालकर व पत्रकार दिपक मूलमुले यांनी ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव हरे येथे कायस्वरूपी डॉक्टर मिळावे या साठी जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव (CH)डॉ.किरण एम.पाटील यांची भेट घेऊन त्यांना पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात असलेले प्रॉब्लम सांगितले असता त्यांनी सकारात्मक उत्तर दिले व दहा ते बारा दिवसात ग्रामीण रुग्णालय पिंवळगाव हरे येथे दोन नवीन एम.बी.बी.एस.डॉक्टर मिळणार आहेत असे डॉ.किरण एम.पाटील यांनी सांगितले आणि या पुढे चांगल्या सुविधा मिळतील असं आश्वासन दिले.

पिंपळगाव हरे येथील ग्रामीण रुग्णालयात परिसरातील २० ते – २५ गांवाचा आरोग्याचा कारभार चालतो. आणि याच ग्रामीण रुग्णालयात गेल्या काही महिन्यापासून गोरगरीब रुग्णांना डॉक्तरांसाठी भटकंती करावी लागत आहे. नेहमी डॉक्टर नसल्याने रुग्णांना बाहेरून उपचार घ्यावे लागत आहे. पिंपळगाव हरे येथे ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या गावातील गोरगरीब रुग्ण दररोज ग्रामीण रुग्णालयात येतात. मात्र डॉक्टर नसल्याने त्यांच्यावर योग्य तो उपचार होत नाही.आणि निराश होऊन परत जावं लागत आहे.

आता पावसाळा सुरु झाला असून सर्दी,ताप,खोखला,या सारखे आजार वाढतील त्या साथी पिंपळगाव हरेश्वर येथे कायस्वरूपी डॉक्टर मिळावा या साठी जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव (CH)डॉ.किरण एम.पाटील यांना भेटून निवेदन देण्यात आले. पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टर नसल्यामुळे गरीब जनतेचे हाल बेहाल होत आहेत.

येथील सरकारी दवाखान्यात कागदोपत्री तीन-तीन डॉक्टर आहेत.पण कायमस्वरूपी एक हि डॉक्टर नाही मागील सहा महिने डॉ.निलेश पवार व त्यांचे मोठे बंधू डॉ.दिपक पवार हे असतांना सगळं सुरळीत सुरु होते अचानक त्यांना पहूर ला पाठवलं त्यामुळे त्यांनीही राजीनामा दिलाय आता पिंपळगाव ला सकाळी दोन तास तात्पुरता डॉक्टर येतात आणि निघून जातात हे किती दिवस चालणार अश्या आशयाच्या तक्रारी केल्या असून सगळ्या सुविधा उपलब्ध असताना पेशंट ला पाचोरा न्यावं लागतंय, याची दखल घेऊन डॉ किरण पाटील यांनी येत्या आठ दिवसात कायमस्वरूपी डॉक्टर देणार असल्याचे कबूल केले आहे.

डॉक्टर न दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शालिग्राम मालकर यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here