शहादा पाडळदा रस्त्यावरील गोमाई नदीच्या पुलावरून ट्रक गेला खाली

51

शहादा पाडळदा रस्त्यावरील गोमाई नदीच्या पुलावरून ट्रक गेला खाली

 

राहुल आगळे

शहादा तालुका प्रतिनिधी

मो. नं: 9325534661

शहादा पाडळदा रस्त्यावरील नदीच्या पुलाखाली नदीपात्रात अप्रोन काँक्रीट पूर्णपणे निघाले असून मोठे मोठे खड्डे पडले आहेत तसेच पुलाला संरक्षण कठडे नसल्याने वारंवार अपघात होत आहेत. चालकाचा ताबा सुटल्याने एक मालवाहू ट्रक थेट नदीपात्रात कोसळला आहे.यात ट्रक चक्काचूर झाला असून चालक व सहकारी जखमी झाले आहेत

गेल्या २५ वर्षांपूर्वी पाडळदा रस्त्यावर गोमाई नदीपात्रात कमी उंचीच्या पुलाचे काम करण्यांत आल्याने अपघात होत आहेत.आतापर्यंत या ठिकाणी सहा नागरिकांचा अपघातामुळे मृत्यू झाला आहे. ४० पेक्षा अधिक गावांचा संपर्क असलेल्या या पुलाला संबंधित विभागाने दुरूस्त करावी आणखी किती वेळ प्रशासनाच्या बेजबाबदार पणामुळे आणखी किती बळी जातील याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच पुल कमी उंचीच्या असल्यामुळे पावसाळ्यात मोठा पूर आल्यावर दोन्ही बाजूंची वाहने तासनतास खोळंबली जातात.त्यामुळे तात्काळ दुरूस्ती करावी अशी मागणी वाहन चालक करीत आहेत.