डॉ. अशोक जिवतोडे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, सहकार व राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची शुभेच्छांकरीता एकच गर्दी

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

 मो: 8830857351

चंद्रपुर, 11 जून: विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे यांचा वाढदिवस रविवार 11 जून रोजी दिवसभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातुन उत्साहाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आ. किशोर जोरगेवार, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार एड. वामनराव चटप, माजी आमदार संजय धोटे, सामाजिक कार्यकर्ते प्रभुजी देशपांडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष एड. देविदास काळे, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष टीकारामजी कोंगरे, वसंत जिनिंग वणीचे संचालक संजय खाडे, संचालक पुरुषोत्तम आवारी, माजी सरपंच तेजराज बोढे, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य, भाजप जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, ॲड. अभयजी पाचपोर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊनकर, माजी बाजार समिती अध्यक्ष दिनेश चोखारे, माजी नगरसेविका सुनिता लोडिया, माजी उपमहापौर राहुल पावडे, ईको-प्रो संस्थापक अध्यक्ष बंडू धोत्रे, लक्ष्मणराव गमे, प्रकाश पाटील मारकवार, डॉ. सुरेश महाकूलकर, माजी कुलगुरू कीर्तीवर्धन दीक्षित, माजी प्राचार्य उमाटे, मनसे जिल्हा अध्यक्ष दिलीप रामीडवर, कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष ॲड. पी.एम. सातपुते, बंडोपंत बोढेकर, वसंतराव थोटे, चंद्रकांत गोहोकर, संध्याताई गोहोकर, यांची उपस्थीती होती. तसेच शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता, सांस्कृतिक, सहकार व राजकीय क्षेत्रातील दिग्गज मान्यवर शुभेच्छा प्रदान करण्यास उपस्थीत होते.

दरम्यान संस्थेच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा जीवतोडे, अंबर जीवतोडे, रोहिणी जीवतोडे व संपूर्ण कुटुंबाच्या तथा जनता परिवाराच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

विविध कार्यक्रमांमधे डॉ. अशोक जिवतोडे यांच्या वजनाच्या भारोभार अन्नधान्य वृध्दाश्रमामधे वाटप करण्यात आले. तर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील रुग्णालयामधे फळं वाटप करण्यात आले. सोबतच चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखेत शेतकरी आत्महत्याग्रस्त, पूरग्रस्त, कोविड-१९ ने मृत झालेल्या पालकांच्या पाल्यांना निःशुल्क प्रवेश, गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता शैक्षणिक साहित्य, पुस्तक भेट व निःशुल्क प्रवेश, महाविद्यालयीन परीसरात वृक्षारोपण, आदी उपक्रम राबविण्यात आले.

डॉ. अशोक जिवतोडे यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय जिवनाची यशस्वी वाटचाल अशीच सुरू राहो, त्यांच्या माध्यमातून विदर्भ विकास, ओबीसी समाजाचे कार्य व बहुजन समाजाची सेवा घडत राहो, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.

शुभेच्छांसाठी यावेळी मान्यवर, पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरीक तथा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी एकच गर्दी केलेली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here