युक्रेन-रशिया युद्ध वॉटर बॉम्बच्या दिशेने ?
रमेश कृष्णराव लांजेवार
मो.नं.9921690779
दि 6 जून: रोज मंगळवारला रशियाच्या ताब्यात असलेल्या खेरसन भागातील “नोव्हा काखोव्का”हे अतिशय महत्वाचे धरण मंगळवारी झालेल्या स्फोटात उध्दवस्त झाले. युक्रेनच्या खेरसनजवळ धरण फुटल्याने अनेक गावं शहरे जलमग्न झाले आहेत. यामुळे युक्रेनमध्ये पुराचा धोका ओढवल्याचे दिसून येते.रशियाने युक्रेनवर हवाईहल्ले केले अनेक मिसाईले डागलीत यामुळे युक्रेन आगीत भाजतो आहे.यात मोठ्या प्रमाणात जिवित हाणी व वित्तीय हाणी सुध्दा झाली.परंतु आता रशियाने युक्रेनच्या लढाईत वॉटर बॉम्बचा वापर केल्याचे दिसून येते. रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले केले.परंतु आता युक्रेनच्या खेरसन शहराजवळील मोठ्या धरणाची भिंत कोसळल्याने संपूर्ण परिसरात पुराचा धोका ओढवल्याचे दिसून येते.
यामुळे युक्रेनने रशियावर आरोप लावला आहे की स्फोटकांच्या सहाय्याने रशियाने मुद्दाम धरणाची भिंत फोडली असावी असा गंभीर आरोप युक्रेनने केला आहे.त्यामुळे आज युक्रेन आगीसह जलप्रलयचा सुध्दा सामना करीत आहे.यामुळे युक्रेनने प्रतिहल्याची तयारी दर्शविली आहे.असे जर झाले तर दोन्ही देश तलाव,नहर,धरण यावर हल्ला करेल अशा परिस्थितीत वॉटर बॉम्ब युध्दाला सुरुवात होईल व अनेक देश जलमग्न होईल.ज्याप्रमाणे संपूर्ण व्दारका पाण्याखाली आली त्याचप्रमाणे जगातील अनेक देश पाण्याखाली येवू शकते याला नाकारता येत नाही.
https://mediavartanews.com/2023/06/11/education-in-mother-tongue-2/
धरणाच्या पाण्यामुळे युरोपातील सर्वात मोठ्या झापोरिशिया अणुप्रकल्पाला धोका निर्माण झाला असून पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची भीती आहे.या दुर्घटनेसाठी युक्रेन आणि रशियाने परस्परांवर आरोप केले आहेत.नीपर नदीवरील काखोव्का धरण आणि जलविद्युत प्रकल्प स्फोटात उडवून दिल्याचे सांगण्यात येत आहे.हा परिसर रशियाच्या नियंत्रणाखाली असुन त्यांनीच या प्रकल्पाजवळ स्फोट घडवल्याचा आरोप युक्रेनने केला आहे.तर दुसरीकडे या परिसरात युक्रेनकडुन सातत्याने बॉम्बफेक करण्यात येत आहे,यातुन धरण फुटल्याची घटना घडल्याचे रशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.परंतु यात मानवीय, पशुपक्षी व वित्तीय हाणी होत आहे त्याचे काय? याकडे कोन्हीही लक्ष देण्यास तयार नाही.फक्त एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून दोन्ही देश बदल्याचे भावनेने कारवाई करू शकते.
त्या पध्दतीची तयारी दोन्ही देशांनी केल्याचे दिसून येते.गेल्या 16 महिन्यांपासून सुरू असलेल्या युक्रेन-रशिया युध्दाची झळ दोन्ही देशांना भोगावी लागत आहे.परंतु धरणाची भिंत कोसळल्याने रशियाच्या नियंत्रणाखाली असलेल्या प्रदेशातील 22 हजार नागरिक तर युक्रेनच्या नियंत्रणाखाली प्रदेशातील 16 हजार नागरिक रहातात.त्यांना सुरक्षित स्थळी नेण्याचे काम दोन्ही देशांकडून युध्दपातळीवर सुरू आहे.या्रून स्पष्ट होते की युक्रेन-रशिया यूध्द सध्याच्या परिस्थितीत “आ बैल मुझे मार ” या स्थितीत येवून ठेपले आहे.धरण फुटल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होवू शकते.याचा फटका रशिया-युक्रेनच्या नागरिकांना बसु शकतो.”नोव्हा काखोव्का” धरण उध्दवस्त झाल्याने त्यातील 1.8 कोटी घनमीटर पाणी परिसरातील गावांमध्ये शिरूर शेकडो लोकांचा बळी जाऊ शकतात.त्यामुळे 100 हुन अधिक गावे व शहरात पूरस्थिती निर्माण होऊ शकते.रशिया-युक्रेनची अशीच संघर्षमय स्थिती राहिली तर धरण, तलाव,नदी यांना हतीयार बनवून वॉटर बॉम्ब युध्दाला सुरुवात होवू शकते.
नोव्हा काखोव्का धरण उध्वस्त करून जलप्रलय दिसून आला ही तर सुरुवात(ट्रेलर) आहे.अशीच परिस्थितीत रहाली तर भयावह स्थिती निर्माण होवू शकते.त्यामुळे जगातील देशांनी युक्रेन-रशिया युध्द ताबडतोब थांबविले पाहिजे.अन्यथा अनर्थ होऊ शकतो.सावधान!