वंचित बहुजन आघाडी मार्फत सन्मान व सत्कार 

सुनील भालेराव

मो: ९३७०१२७०३७

अहमदनगर ब्युरो चीफ

१०, जून,अहमदनगर: जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामध्ये मा. शांतारामजी रणशुर साहेब तसेच मा.शिमोनजी जगताप साहेब.यांचा सत्कार करण्यात आला .दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख आदरणीय बौद्धाचार्य मा. शांतारामजी रणशूर साहेब. यांनी अहमदनगर जिल्ह्यामध्ये बौद्ध धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी खूप मेहनत घेतली.

तसेच आपल्या सुंदर वाणीने अनेकांची मने जिंकली त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीचे अधिकारी व पदाधिकारी तसेच भीमसैनिकांतर्फे जगताप साहेब व रणशूर साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here