जगभरात ChatGPT का झाला बंद? ChatGPT बंद कायमचं झाल्यास तुमच्या आयुष्यावर काय होईल परिणाम?

21
chatgpt-global-outage-openai-service-down-reason-impact

गेल्या काही तासांत जगभरात अचानक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे OpenAI चा ChatGPT अचानक बंद पडणं! 10 जून 2025 रोजी दुपारी 2:45 वाजल्यापासून लाखो वापरकर्त्यांना ChatGPT, Sora Text-to-Video, तसेच OpenAI च्या API सर्व्हिसेसमध्ये त्रुटी जाणवू लागल्या.

Downdetector या वेबसाईटवर तब्बल 1100 हून अधिक वापरकर्त्यांनी “ChatGPT काम करत नाही” अशी तक्रार केली. सर्वाधिक 93% समस्या ह्या केवळ ChatGPT मध्येच होत्या. यामुळे सोशल मीडियावर #ChatGPTisDown हा हॅशटॅग जबरदस्त व्हायरल झाला आणि मेम्सचा अक्षरशः पूर आला!

OpenAI चं स्पष्टीकरण – नेमकं काय घडलं?

OpenAI ने आपल्या स्टेटस पेजवर सांगितलं की ही समस्या त्यांना ओळखली असून ती सोडवण्यासाठी ‘mitigation measures’ लागू करण्यात आली आहेत. रात्री 10:20 वाजता ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि 1:04 वाजेपर्यंत ChatGPT व API सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या.

परंतु, ‘Voice Mode’ या फीचरमध्ये अजूनही त्रुटी जाणवत असून OpenAI ने त्यासाठी ‘Post Incident Monitoring’ सुरु ठेवलं आहे. याचा अर्थ, काही वेळ वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

ChatGPT कायमचं बंद झालं तर? – तुमचं डिजिटल आयुष्य ठप्प?

आज लाखो लोक आपलं दैनंदिन काम, शिक्षण, संशोधन, लेखन आणि अगदी रिलेशनशिप सल्ले सुद्धा ChatGPT कडून घेतात. जर भविष्यात ChatGPT सारखी AI सेवा कायमची बंद पडली तर:

✔️ डिजिटल कामकाज ठप्प: लेखक, स्क्रिप्ट रायटर, विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट्स थांबतील.
✔️ मार्केटिंग कंपन्या हवालदिल: SEO, Ad Copy, Marketing Plans बनवणारे दिवस भर अडचणीत येतील.
✔️ AI Tools चा पर्याय शोधण्याची धावपळ: लोक Google Gemini, Claude, Microsoft Copilot कडे वळतील.

ChatGPT काही तासांनी पुन्हा सुरू झाला असला तरी हा प्रसंग पुन्हा घडल्यास वापरकर्त्यांच्या रोजच्या आयुष्यावर मोठा परिणाम होईल.

तुमचं मत काय? ChatGPT नाही राहिला तर तुमचं काम कसं सांभाळाल? खाली कॉमेंट करा!