काटा समजून दुर्लक्ष केले, मात्र तो सापच होता;

काटा समजून दुर्लक्ष केले, मात्र तो सापच होता;

त्रिशा राऊत नागपुर क्राइम रिपोर्टर मो 9096817953

भिवापुर :- .धनराज नंदरधने (४४) या सोमवारी सकाळी शेतात भाजी तोडत असताना हाताच्या बोटाला काहीतरी टोचल्यासारखं जाणवले. फक्त एका ठिकाणीच व्रण दिसल्याने काटा रुतला असेल असे समजून त्यांनी दुर्लक्ष केले.नंतर अस्वस्थ वाटूनही त्यांनी मांत्रिकाकडे उपचार केले. मात्र तीन तासांनी त्यांचा मृत्यू झाला. भिवापूर तालुक्यातील खातीपुरा येथे ही घटना घडल्यावर एक दात तुटलेल्या सापाचा दंश संभ्रम निर्माण करून मृत्यूस कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे.

रेखा यांना काहीतरी चावल्याचे जाणवल्यानंतर जवळपास दीड तास त्या काम करत राहिल्या. मात्र, नंतर अस्वस्थ वाटू लागल्याने त्या घरी निघाल्या. वाटेत त्रास वाढल्याने त्या एका दुकानात थांबल्या व पतीला फोन करून परिस्थिती सांगितली. पती धनराज नंदरधने तिथे पोहोचले. हातावर फक्त एकच खुण दिसल्यामुळे त्यांनी रेखाला विंचू वगैरे चावला असावा असा समज करून घेतला आणि विष उतरवण्यासाठी एका मांत्रिकाकडे घेऊन गेले.

मांत्रिकाकडून घरी परत येतपर्यंत तीन तासांपेक्षा जास्त वेळ झाला होता. रेखा यांची प्रकृती अधिकच बिघडली होती. शेवटी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. डॉक्टरांनी साप चावल्याचा अंदाज व्यक्त करून प्राथमिक उपचार करून रेखा यांना नागपूर मेडिकल रुग्णालयात पाठवले. मात्र, रस्त्यातच त्यांना श्वास घेण्यात अडचण येऊ लागली आणि गतप्राण झाल्या. मेडिकलमध्ये पोहोचताच त्यांना मृत घोषित करण्यात आले. रेखा यांच्या पश्चात त्यांचे पती आणि १३ वर्षांची मुलगी आहे. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

मांत्रिकांच्या नादी न लागता रुग्णालयात जा

कधी-कधी शिकार करताना सापाचा एक दात तुटून जातो. मात्र, राहिलेल्या एका दाताने सुद्धा साप चावा घेतो आणि शरीरात विष सोडतो. त्यामुळे एकाच ठिकाणी चावलेली खूण असूनही सर्पदंशाची असू शकते. दुर्दैवाने अनेकजण अशा एकाच दाताच्या खुणेवरून सर्पदंश झाला नसावा, असा गैरसमज करून वैद्यकीय उपचार करतच नाहीत. मात्र, अशाप्रसंगी तात्काळ वैद्यकीय उपचार अत्यावश्यक ठरतात. सर्पदंशानंतर गावठी उपाय किंवा मांत्रिकाच्या नादी न लागता रुग्णालयात जाऊनच उपचार घ्यावे, यामुळेच जीव वाचू शकतो, असे वाइल्डलाइफ सोसायटीचे सचिव व सर्पमित्र नीतेश भांदकर यांनी सांगितले.