17 वर्षीय अल्पवयीन मुलाचे गावातील एका विवाहित महिला बरोबर प्रेमसंबंध, त्यात झाल अस काही पुर्ण बुलढाणा जिल्हा हादळला

✒ मुकेश चौधरी ✒
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
7507130263
बुलढाणा/मलकापुर,दि.10 जुलै:- बुलढाणा जिल्हातील मलकापुर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचे गावातील एका विवाहित महिला बरोबर प्रेमसंबंध जुळले. हा अल्पवयीन मुलगा या महिलेला नेहमी वहिनी वहिनी म्हणत तो गावातील एका महिलेला वारंवार भेटायचा आणि त्यातूनच त्यांच्या मनात प्रेमअंकुर फुलले. पण प्रेम हे लपत नसते याबाबत महिलेच्या सासरच्या माणसांना संशय आला होता. मात्र, आपले कुणासोबतही संबंध नसल्याचं त्या महिलेने सांगितले. तसेच तिच्या पतीचाही तिच्यावर विश्वास केला आणि आपल्या पत्नी आणि मुला बरोबर आपला संसारात मग्न झाला.
बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील एका गावात 4 जुलैच्या मध्यरात्री घरात दोघांचे मृतदेह आढळले. या मृतकांमध्ये अल्पवयीन मुलाचे संबंध असलेली महिला आणि त्याच्या एका मुलाचा समावेश होता. मिळालेल्या माहितीनुसार, 4 जुलैच्या मध्यरात्री हा प्रियकर विवाहित महिलेच्या घरात शिरला. याची कल्पना विवाहितेच्या सासूला आली आणि त्यानंतर तिने शेजारील आपल्या पुतण्याला बोलावले. घराचा दरवाजा ठोठावला असता काहीच प्रतिसाद आला नाही.
पती आणि सासरच्यांनी विवाहितेला पाजले विष; कारण ऐकताच बसेल आश्चर्याचा धक्का
घरातून विचित्र वास येत असल्याने गावातील ज्येष्ठ नागरिक आणि पोलीस पाटलांना बोलवण्यात आले. त्यानंतर घराचा दरवाजा तोडण्यात आला. यावेळी यावेळी ही विवाहित महिला आपल्या दोन मुलांसह घरात गंभीर अवस्थेत आढळून आली तसेच तिचा अल्पवयीन प्रियकर हा सुद्धा गंभीर अवस्थेत होता. तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, विवाहित महिला आणि तिचा 6 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.
तर अल्पवयीन प्रियकर आणि विवाहितेचा मोठा मुलगा या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांच्या चौकशीत अल्पवयीन प्रियकराने या सर्वांना विष पाजल्याने कबुल केले. त्यानंतर स्वत: सुद्धा विष प्राशन केले. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.