कळमेश्वर येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न.

✒युवराज मेश्राम✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
95275 26914
कळमेश्वर,दि.11 जुलै :- येथे युवा सेनेच्या वतीने व कळमेश्वर शहरवासीयांच्या वतीने खुले नाट्यमंदिर येथे शनिवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यातील कळमेश्वर शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला गेला. याचे उद्घाटन प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख राजू हरणे तर महिला आघाडीच्या अध्यक्षा वंदना लोणकर उपस्थित होत्या. उपजिल्हाप्रमुख अशोक जंगले, दिवाकर पाटणे, डॉक्टर घनश्याम मकासरे, विधानसभा संघटकपदी मध्ये प्रदीप गोतमारे, परमेश्वर पोलिस स्टेशनचे ठाणेदार आसिफ राजा शेख, एपीआय मनोज खडसे गायकवाड, युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रशांत इखार, किशोर तुरकर, शहर संघटक सचिन रघुवंशी, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख सुजाता निमजे, उपतालुका प्रमुख आकोटकर, सामाजिक कार्यकर्ते प्रमुख डांगे मनोज, शिरसागर, मनोज डांगोरे, संजय ढोक, संजय रक्षक, दैनिक सकाळचे तालुका प्रमुख चंद्रकांत श्रीखंडे, मिडिया वार्ता न्यूजचे प्रतिनिधी युवराज मेश्राम, लोकमतचे तालुका प्रतिनिधी आसिस सौदागर गजेंद्र निंबेकर प्रामुख्याने उपस्थित होते.