फलज्योतिष अभ्यासक्रमाला मान्यता देऊ नये: अ.भा.अंनिस तालुका शाखेचे निवेदन.

फलज्योतिष अभ्यासक्रमाला मान्यता देऊ नये: अ.भा.अंनिस तालुका शाखेचे निवेदन.

फलज्योतिष अभ्यासक्रमाला मान्यता देऊ नये: अ.भा.अंनिस तालुका शाखेचे निवेदन.
फलज्योतिष अभ्यासक्रमाला मान्यता देऊ नये: अ.भा.अंनिस तालुका शाखेचे निवेदन.

मुकेश चौधरी
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
7507130263
हिंगणघाट,दि.10 जुलै:- संतांची आणि समाजसुधारकांची शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या व पुरोगामी विचारांचे राज्य अशी ओळख असलेल्या या महाराष्ट्रात इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाद्वारे फलज्योतिषशास्त्र हा अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे.
अनेक समाजसुधारकांची विवेकवादी व विज्ञाननिष्ठेची परंपरा पुढे नेणे हे महाराष्ट्रातील सुज्ञ तरुणाई आपले कर्तव्य मानते. अशावेळी इगनुद्वारे या वर्षांपासून जोतिषशास्त्र या विषयात पदवी आणि पदवीका हे अभ्यासक्रम सुरु करणे म्हणजे विज्ञानयुगात लोकांना अंधश्रद्धेच्या दरीत लोटण्यासारखे आहे.जोतिषशास्त्राची पदवी देऊन महाराष्ट्रात कर्मकांड करविणारे आणि त्यांच्याकडे आपली बुद्धी गहाण ठेवून वेळ, पैसा आणि श्रम वाया घालवणारी अविवेकी आणि आळशी नवीन पिढी आपल्याला तयार करावयाची आहे का ? आपला समाज विज्ञानाच्या दिशेने जाण्याऐवजी अज्ञानाच्या खाईत ढकलण्याचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी इगणूद्वारे प्रस्तावित या अभ्यासक्रमाला महाराष्ट्रात मान्यता देऊ नये असे निवेदन अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समिती, हिंगणघाटच्या वतीने तहसीलदार श्रीराम मुधडा यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
यावेळेस अभा अंनिस च्या तालुकाध्यक्षा राजश्री विरुळकर, श्री.पंकज येनूरकर,सौ.माधुरी विहीरकर, संगीता मस्कर, निखिल ठाकरे आदी तालुका शाखेचे आदी सदस्य उपस्थित होते.