वर्धा जिल्हात वाळू तस्कर सुसाट; जिल्हा प्रशासन झोपेत.
वर्धा जिल्हात वाळू तस्कर सुसाट; जिल्हा प्रशासन झोपेत.

वर्धा जिल्हात वाळू तस्कर सुसाट; जिल्हा प्रशासन झोपेत.

वर्धा जिल्हात वाळू तस्कर सुसाट; जिल्हा प्रशासन झोपेत.
वर्धा जिल्हात वाळू तस्कर सुसाट; जिल्हा प्रशासन झोपेत.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
वर्धा:- सध्या संपुर्ण जिल्हात पावसाचा जोर वाढला आहे. नदी, नाले भरुन आहे, तर जिल्हात बांधकामाला वाळू कोठून येत आहे हा मोठ्या प्रश्न जनता प्रशासनाला विचारत आहे. वर्धा जिल्हातील हिंगणघाट, देवळी, पुलगाव, आर्वी आणि वर्धा तालुक्यात वाळू उपशाचे त्रांगडे झाले असून, जिल्ह्यातील एकाही वाळू ठेक्यातून उपसा करण्यास परवानगी नाही तरीही अवैधरित्या उपसा करून वर्धा जिल्हातील अनेक शहरामध्ये विविध ठिकाणी वाळूचे साठे करून ठेवण्यात आले आहेत. नगरपालिका आणि महसूल विभागाकडून मात्र कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने जिल्ह्यात तस्कर मोकाट झाले आहेत.

वर्धा जिल्ह्यात इतर गौण खनिजांबाबतही फारशी स्थिती वेगळी नाही. अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर शहर परिसरातील डोंगर तसेच खदानींमधून गौणखनिजांचा सर्रास उपसा करण्यात येत आहे. या प्रकाराला चाप बसवण्यासाठी प्रशासाकडून महिन्याला कारवाया करण्यात येत असल्याचे शासन दप्तारातील नोंद सांगते. वाळूचोरी, अवैध खदानींबद्दल वर्धा जिल्हाधिकारी मुख्यालयात झालेल्या बैठकांमध्ये अधिकाऱ्यांची खरडपट्टी होत असली तरी, गौणखणिजाची चोरी रोखण्यात प्रशासनाला पूर्णपणे यश आलेले नाही.

वर्धा जिल्हातील अनेक शहरामध्ये अनेक ठिकाणी अवैध वाळूसाठा करण्यात येत असून येथून वाळूची विक्री करण्यात येते. आता तर हे वाळू माफिया चक्क ग्रामीण भागात अवैध वाळूची साठवनुक करुन ट्रॅक्टर द्वारा बांधकाम करणा-या घरी मोठी रक्कम घेऊन अवैध वाळू आणि गौण खनिज टाकत आहे. या प्रकाराकडेही प्रशासन डोळेझाक करत आहेत.

चिरीमिरी मिळाली नाही तर होते कारवाई.
अवैध वाळू तसेच गौणखनिज माफिया कडुन भष्ट्र अधिका-याला चिरीमिरी मिळाली नाही तर अवैध वाहतूक व साठे करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाते. सर्व म्यानेज झाल की, त्यानंतर कुठलीही कारवाई होत नाही. शहरात बेकायदा साठा करण्यात येणाऱ्या वाळूबाबत महसूल व नगरपालिका प्रशासनाने कारवाई करणे अपेक्षित असताना कुठेही जप्तीची कारवाई होत नाही.

चिरीमिरी जोरात, प्रशासन कोमात.
गेल्या काही वर्षांपासून वाळू उपशाचे जिल्ह्यात त्रांगडे आहे. भरमसाठ दरामुळे ठेकेदार पुढे येत नाहीत. पर्यायाने चोरी करण्याचा सोपा मार्ग तस्करांनी अवलंबला आहे. वर्धा जिल्ह्यात सध्या एकाही वाळू उपशाला परवानगी नाही. मात्र अवैध उपसा जोरदार सुरू आहे. वाळू लिलावामध्ये सहभागी न होता चिरीमिरी देऊन वाळू तस्कर सर्रास शहरात वाळू विक्रीसाठी घेऊन येत असल्याचे चित्र आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here