जळगाव येथे खोटे नगर परिसरात पुर्व वैमन्यातुन तरुणाची हत्या

48

जळगाव येथे खोटे नगर परिसरात पुर्व वैमन्यातुन तरुणाची हत्या

जळगाव येथे खोटे नगर परिसरात पुर्व वैमन्यातुन तरुणाची हत्या
जळगाव येथे खोटे नगर परिसरात पुर्व वैमन्यातुन तरुणाची हत्या

            मिडिया वार्ता न्यूज
        जळगाव जिल्हा प्रतिनिधी 
          ✒ विशाल सुरवाडे

जळगाव – शहरातील खोटेनगर परिसरातील एका तरुणाचा धारदार शस्त्राने खुन झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेमुळे खोटे नगर परिसरात खळबळ उडाली आहे.
महेश वासुदेव पाटिल ऊर्फ डेम्या असे मयत तरुणाचे नाव आहे. तो खोटेनगर परिसरात राहणारा होता. शनिवारी ९.४५ च्या सुमारास हत्या झाली. पुर्व वैमन्यातुन त्याची हत्या झाली आहे .
हत्या झाल्यानंतर परिसरातील नागरीकांनी घटनास्थळावर गर्दी केली होती.
तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षकांसह पोलिस ताफा घटनास्थळावर दाखल झाला. मृतदेह जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मृतदेह पाहून नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात आक्रोश केला होता.