मंगरूळपीरचा आठवडी बाजार भरतो चिखलात
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀
वाशिम /मंगरूळपीर
शहरातील शनिवारी भरणारा आठवडी बाजार हा ग्रामीण भागातील जनतेला तालुका ठिकाणी जोडणारी नाड आहे. शहरातील व ग्रामीण भागातील नागरिक आठवडा भराचा किराणा व भाजीपाला खरेदीसाठी येथील आठवडी बाजारात येत असतात परंतु पावसाळ्यात येथील आठवडी बाजारात जिकडे तिकडे चिखल असल्याने नागरिकांना बाजार करते वेळी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील नगर परिषदेला त्याचे काही देणेघेणे नसल्याचे चित्र येथील आठवडी बाजारातील झालेल्या चिखलाला कडे पाहून होते आहे. मंगरूळपीर नगर परिषदने काही वर्षा अगोदर शहरातील मानोरा रोडवर कोट्यवधी रुपये खर्च करून आठवडी बाजाराची निर्मिती केली. निर्मितीचे कंत्राट मर्जीतील कंत्राटदाराला दिले. कंत्राटदार व तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी पन्नास टक्के कामाला व पन्नास टक्के आम्हाला हा मूलमंत्र जपून या आठवडी बाजाराची उभारणी केली. मंगरुळपीर आठवडी बाजार असा चिखलाने माखलेला असतो. त्याचे दुष्परिणाम नागरिकांना सहन करावे लागत आहे. सध्यास्तिथीत मंगरूळपीरच्या आठवडी बाजारात ओट्याची स्तिथी अत्यंत दयनीय झाली असून व्यापाऱ्यांना त्यांची दुकाने धड लावता येत नाहीत. निम्याहून बाजार मानोरा रोडवरच भरतो तर बाजार करीत असताना नागरिकांना रस्ते व्यवस्थित नसल्याने चिखल तुडवत बाजार करावा लागतो. बाजारात घाणीचे साम्राज्य असल्याने व्यापाऱ्यांच्या मालावर माश्या बसत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु येथील नगर परिषद हा आठवडी बाजार हर्रास करून आपली जबाबदारी झटकण्यातच धन्यता मानते. आठवडी बाजार संपल्यावर दुसऱ्या दिवशी बाजारात घाण पडलेली असते त्याची स्वच्छता सुद्धा करण्यात येत नाही. आठवडी बाजारात पुरुषांसाठी व महिलांसाठी स्वच्छता गृह नाही. अश्या अनेक समस्या असून येथील नगर परिषद शहरातील नागरिकांच्या मूलभूत सोयी सुविधा करीता आहे की कशासाठी आहे असाही प्रश्न शहरातील नागरिक करीत आहेत.
भार प्रभारीच्या खांद्यावर सध्या मंगरुळपिर नगर परिषदे मध्ये मुख्याधिकारी नसल्याने मुख्याधिकारी पद हे प्रभारीच्या खांद्यावर असल्याने त्यांचे सुद्धा पाहिजे तसे लक्ष नाही. सध्या पावसाळ्यात साथ रोगाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता शहरातील ठिखठिकाणी फवारणी करणे गरजेचे आहे. बाजारातील भाजीपाल्यावर चिखलामुळे माश्या बसतात त्यामुळे नागिरीकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तरी वरिष्ठ अधिकारी यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे बोलल्या जात आहे.✍