आरे जंगल साफसफाईसाठी निसर्गमित्राची हाक
पूनम पाटगावे
जोगेश्वरी मुंबई प्रतिनिधी
मो. नं. 8149734385
जोगेश्वरी:- सध्या आरेचे जंगल हे मेट्रो-3 कारशेड प्रकरणी चर्चेचा विषय बनला आहे. आरे बचाव करण्यासाठी निसर्गप्रेमीकडून आंदोलने केली जात आहेत. परंतु याच निसर्गाची देणं मानलेल्या आरेच्या जंगलाला प्रदूषित करण्याचे काम काही समजकंटकाकडून केले जातेय.
आरेच्या जंगलामध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांकडून expire झालेला माल, घराच्या बांधकामासाठी लागणारे सिमेंट, पत्रे, लाद्या अशाप्रकारचे खराब झालेले साहित्य, प्लास्टिकच्या बॉटल्स आणि इतर निरूपयोगी वस्तू टाकल्या जात आहेत. आरेमध्ये बरीच लोकं दारू पिऊन तेथे बाटल्या टाकून जातात. त्या बटल्यांच्या काचा तेथील पक्षी, प्राणी यांना लागण्याचा संभव असतो. दारू पिऊन फोडलेल्या बाटल्यांचा त्रास जंगलात राहणाऱ्या प्राणीमात्राना होतो त्यामुळे तेथील प्राणी, पक्षी जखमीदेखील झाले आहेत. आरेमध्ये दिवसेंदिवस हा वाढत जाणारा कचरा आणि त्यामुळे पर्यावरणाची जी हानी होतेय ती भरून न निघणारी आहे. हा वाढत जाणारा कचरा आणि त्यामुळे वाढणारे प्रदूषण लक्षात घेता एका निसर्गमित्राने आरेमध्ये साफसफाईची मोहीम हाती घेतली आहे. शंकर सुतार हा सच्चा निसर्गमित्र आरेच्या
जंगलाची साफसफाई कोणाचीही मदत न घेता स्वखर्चातून करतो. तेथे सापडणाऱ्या टाकाऊ प्लास्टिकच्या बॉटल्सचा उपयोग पक्षीप्राण्यांची तहान भागवण्यासाठी करतो. तसेच त्याने प्राणीमात्राची तहान भागावी म्हणून आरेमध्ये विविध ठिकाणी छोटे छोटे पाण्याचे डबके बनवले आहेत. तसेच या निसर्गमित्राने विविध ठिकाणी साफसफाई करून त्याठिकाणी झाडे लावली आहेत. दर रविवारी हा निसर्गमित्र आरेत श्रमदान करून कचरा जमा करून गोण्यात भरून ठेवतो.
परंतु अशी एक खेद वाटणारी बाब म्हणजे आरेतील हा कचरा उचलण्यासाठी निसर्गमित्राने महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनदेखीलही महापालिकेने याबाबत कोणतीही दखल घेतली नाही, तरी महापालिकेने लवकरात लवकर हा कचरा उचलावा अशी मागणी निसर्गमित्राने केली.