पाच दिवस बेपत्ता असलेल्या सचिनचा मृतदेह सापडला नदीत…हत्या की आत्महत्या?

48

खळबळजनक – पाच दिवस बेपत्ता असलेल्या सचिनचा मृतदेह सापडला नदीत, हत्या की आत्महत्या पोलिसांकडून कसून तपास सुरु…

सचिन पवार 

कोकण ब्युरो चीफ

मो: 8080092301

रोहा ( रायगड):- सचिन वैजनाथ शिंदे वय 30 वर्षे राहणार काजूवाडी खारी रोहा, सचिन हा दिनांक 4 जुलै रोजी सकाळी सात वाजल्याच्या सुमारास घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेला. त्याची मिसिंग तक्रार सचिन याचे वडील यांनी पाच जुलै रोजी रोहा पोलीसात नोंदवली होती.

रोहा पोलिसांकडून आणि नातेवाईकांकडून त्याचा पाच दिवस कसून शोध चालू होता. अखेर आज दिनांक 10 जुलै रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास करंजवाडी डोंगरी येथील कुंडलिका नदीच्या खाडीमध्ये त्याचा मृतदेह तरंगताना आढळला. याची माहिती रोहा पोलिसांना समजतात रोहा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. व मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आला आहे.

या  मागचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. हत्या की आत्महत्या याचा कसून शोध रोहा पोलीस करीत आहे.