वाढत्या लोकसंख्येचे आपल्याला भोगावे लागतील ‘हे’ घातक परिणाम…

66

सावधान…वाढती लोकसंख्या सर्वच बाबतीत जगाला घातक

रमेश कृष्णराव लांजेवार

मो: ९९२१६९०७७९

लोकसंख्या अशीच वाढत राहाली तर “निसर्गाचा ह्रास आणि लोकसंख्या वाढीचा त्रास”जगातील प्रत्येक व्यक्तीला,संपूर्ण जीवजंतूला व वन्य प्राण्यांना भोगावाच लागेल.वाढत्या लोकसंख्येचा धोका पहाता जागतिक स्तरावर लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्याची नितांत गरज आहे. लोकसंख्या वाढ ही जगातील प्रत्येक देशाच्या विकासामध्ये व्यत्यय निर्माण करीत असते. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणाच्या उद्देशाने ११ जुलै १९८७ ला जागतिक लोकसंख्येचा विचार केला तर ५०० कोटी लोकसंख्या असल्याचे लक्षात आले.ही बातमी जगभर पसरली.त्या उद्देशाने लोकसंख्या नियंत्रणासाठी वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येवु लागले.संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकासविषयक कार्यक्रमाच्या (UNDP) गव्हर्निंग कौन्सिलने ११ जुलै हा दिवस”जागतिक लोकसंख्या दिन” जगभर साजरा केला जावा अशी शिफारस केली.या शिफारशी नुसार ११ जुलै १९८९ पासून ११ जुलै हा दिवस”जागतिक लोकसंख्या दिन”म्हणून साजरा केला जातो.

जगाची लोकसंख्या १९८७ ला ५०० कोटी होती.यानंतर २०१९ मध्ये ७७० कोटींवर पोचली. यात सर्वाधिक लोकसंख्या आशिया खंडात ४४६.२७ कोटी असल्याचे दिसून आले.यानंतर आफ्रिका, युरोप,उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया व अंटार्टिका अशा पध्दतीने या खंडात लोकसंख्येचा क्रमवार होता.भारताचा विचार केला तर १९५१ साली फक्त ३६ कोटी लोकसंख्या होती.ती आजच्या घडीला १४० कोटीच्या आसपास गेली आहे.हा भारतासाठी चिंतेचा आणि गंभीर विषय आहे.२०१४ च्या आकडेवारी नुसार सर्वाधिक लोकसंख्या असनारे देश याप्रमाणे प्रथम चीन, भारत, अमेरिका, इंडोनेशिया, पाकिस्तान, ब्राझील, नायजेरिया, बांगलादेश, रशिया व जापान ४३८ कोटी लोक या दहा देशात रहातात.हा आकडा जागतिक लोकसंख्येच्या ५७ टक्के इतका आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे.

आज संपूर्ण जगात लोकसंख्या वाढीचा विचार केला तर भारताच्या भुभागाच्या तुलनेत लोकसंख्येच्या बाबतीत भारत प्रथम क्रमांकावर आहे आणि चीनच्या भुभागाच्या तुलनेत चीन लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.आज भारताची लोकसंख्या १४० कोटींच्या घरात आहे हा अत्यंत चिंतेचा आणि गंभीर विषय आहे.भारतातील लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रत्येक राज्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे व मुख्यत्वेकरून मुख्यमंत्र्यांनी याकडे जातीने लक्ष घालायला हवे.त्याचबरोबर पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष व पक्ष-विपक्षांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी पुढाकार घ्यायला हवा.वाढती लोकसंख्या संपूर्ण देशालाच नाही तर संपूर्ण जगाला घातक ठरत आहे.वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक देशांना कठोर परीस्थितीशी सामना करावा लागत आहे.यामुळे बेरोजगारी,भुकमरी, महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्यां, महागडे शिक्षण, उपासमार, कुपोषण, पाणी टंचाई, इंधन, औषधांची समस्या इत्यादींचा सामना आज सर्वांनाच करावा लागत आहे.

वाढती लोकसंख्या प्रत्येक देशाला विकासापासून वंचित करण्याचे कार्य करीत असते याकरिता प्रत्येक देशाचे दायीत्व बनते की लोकसंख्या नियंत्रण काळाची गरज आहे.वाढत्या लोकसंख्येमुळे देशाचा विकास खुंटतो व देश डबघाईस येतो. देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहरीकरणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचप्रमाणे कारखाने व उद्योग धंदे मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे लोकांच्या रहाण्याच्या व्यवस्थेकरीता मोठ्या प्रमाणात जंगल संपत्तीचा विनाश होत आहे.म्हणजेच लोकसंख्या वाढीमुळे जंगलसंपदा संपुष्टात येत आहे. त्यामुळे आज जंगलातील हिंसक प्राणी शहरांकडे धाव घेतांना दिसतात.भारतातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता यावर नियंत्रण आणण्याची नितांत गरज आहे. वाढत्या लोकसंख्येचे विक्राळ रूप पहाता आता भारत सरकारने “एक परीवार एकच अपत्य” असा कायदा सर्वांसाठी अमलात आणावा मग तो व्यक्ती  कोणत्याही धर्माचा असो.यामुळे लोकसंख्येवर नियंत्रण ठेवता येईल. अन्यथा भारतात अशीच लोकसंख्या वाढत राहाली तर मानुस मानसाला मारल्या शिवाय रहाणार नाही.कारण वाढत्या लोकसंख्येमुळे देशाच्या विकासासाठी अनेक अडथळे निर्माण होतांना दिसतात.

भारतात लोकसंख्या इतकी झपाट्याने वाढली आहे की अनेक लोक फुटपाथवर झोपतांना दिसतात, नदीच्या काठावर घरे, रेल्वे रूळाच्या जवळ घरे, तलावाच्या काठावर घरे अशा दुर्घटना स्थळी मोठ्या प्रमाणात झोपड्या पहायला मिळतात हा संपूर्ण प्रकार लोकसंख्या वाढीचा आहे. आज जगाला लोकसंख्या वाढी पेक्षा वृक्ष वाढवीण्याची नितांत गरज आहे.कारण वृक्ष तोडीमुळे सुर्य आग ओकत आहे.आज पृथ्वी लोकसंख्या वाढीच्या भाराखाली दिवसेंदिवस दबत आहे.त्यामुळे आज लोकसंख्या वाढीपेक्षा निसर्ग वाढीवर भारतासह संपूर्ण जगाने जास्त भर दिला पाहिजे. “निसर्गाचा ह्रास आणि लोकसंख्या वाढीचा त्रास” दिवसेंदिवस संपूर्ण जगाला होत आहे.याला कोठेतरी रोखले पाहिजे.मानवाने स्वत:च्या स्वार्थासाठी लोकसंख्या वाढवीली आहे. त्यामुळे आज हिंसक प्राणी मानवावर आक्रमण करताना दिसतात यामुळे मनुष्य व प्राणी यांच्यात वैरत्व निर्माण झाले आहे.ही परीस्थिती मानवाने स्वत:हुन ओढावली आहे.

मानवाच्या अतीरेकामुळे आज पृथ्वीचे संतुलन डगमगतांना दीसत आहे.त्याचबरोबर समुद्राची पातळी दरवर्षी सरासरी ३.५ मिलिमीटरने वाढत आहे.म्हणजेच दिवसेंदिवस पृथ्वीचा भुभाग धोकादायक स्थितीमध्ये मानवाने आणल्याचे दिसून येते.कोव्हिड-१९ महामारी ही सुध्दा मानवाच्या अतीरेकाचे कारण आहे.चीनमध्ये एवढी लोकसंख्या वाढली आहे की तेथील लोक समुद्र किनाऱ्यावर रहातात.त्यामुळे चीन “विस्तारवादाचे” घृनीत कृत्य करतांना दिसतो.हा संपूर्ण प्रकार चीनच्या वाढत्या लोकसंख्येमुळे उद्भवलेला आहे.चीनच्या विस्तारवादाच्या भुमिकेमुळे जगातील अनेक देश चीनच्या विरोधात गेले आहे.म्हणजेच लोकसंख्या वाढीचा एवढा घातक परिणाम होत आहे की मानव एक-मेकावर बंदुक तानुन बारूदच्या ढीगाऱ्यावर बसला आहे. यावरून स्पष्ट होते की लोकसंख्या वाढीमुळे जग भुईसपाट व्हायला काहीच वेळ लागणार नाही.त्यामुळे लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे प्रत्येक देशाचे प्रथम कर्तव्य असायला पाहिजे असे मी समजतो.

आज लोकसंख्या वाढीमुळे भारताच्या दरडोई उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.वाढती लोकसंख्या पहाता अनेक व्यापारीवर्ग भेसळयुक्त पदार्थ,कार्बाइडने पिकवीलेली विषारीयुक्त फळे, भेसळयुक्त दूध इत्यादी अनेक विषारी वस्तुचा वापर लोकांना करावा लागतो.यामुळे घातक बीमाऱ्यासुध्दा होवु शकतात आणि होत आहे.यामागचे मुख्य कारण म्हणजे वाढती लोकसंख्या होय.अनेक कारणांवरून असे दिसून येते की वाढत्या लोकसंख्येमुळे भारतासह अनेक देशांमध्ये विक्राळ रूप धारण केले आहे.याला रोखण्यासाठी कठोर पावले उचलन्याची नितांत गरज आहे.जगात व देशात वाढत्या प्रदूषणाला जबाबदार वाढती लोकसंख्याच आहे.लोकांच्या सुखसुविधांकरीता विमान वाहातुक,रोड वाहातुक,रेल्वे वाहतूक व इतर वाहतूक इत्यादी मोठ्या प्रमाणात वाहने धावतांना दीसतात यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.याचा परीनाम असा होत आहे की अनेक आजारांना खुले आमंत्रण दिल्या जात आहे.त्यामुळे ११ जुलै जागतिक लोकसंख्या दिन लक्षात घेता देशातील सर्व राज्यांनी व केंद्र सरकारनी वाढती लोकसंख्या नियंत्रणासाठी युध्दपातळीवर प्रयत्न केले पाहिजेत. कारण वाढती लोकसंख्या देशाला दीवसेंदीवस घातक ठरत आहे.काही राजकीय पक्ष आपला धर्म धोक्यात आहे,आपल्या धर्माची लोकसंख्या कमी होत आहे असे सांगून धर्माचे काही ठेकेदार लोकसंख्या वाढवीण्याचा सल्ला देतात.अशांवर राज्य व केंद्र सरकारने ताबडतोब कठोर कारवाई केली पाहिजे.

मानव हा बुध्दीजीवी प्राणी आहे.त्यामुळे मानवाने संपूर्ण सीमारेषांचे उल्लंघन केल्याचे दिसून येते.मानवाच्या बुध्दीजीपनामुळे आज निसर्गाच्या सान्निध्यात रहाणाऱ्या पशु-पक्षांचे जगने अत्यंत कठीण झाले आहे.याचे मुख्य कारण म्हणजे वाढती लोकसंख्या होय.भारताने लोकसंख्येवर वेळीच नियंत्रण ठेवले नाही तर पुढेचालुन अनेक कठीणायीचा सामना करावा लागेल.हेही तेवढेच सत्य आहे. त्याचप्रमाणे लोकसंख्या अशीच झपाट्याने वाढत रहाली तर कोणतेही सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही.त्यामुळे आताच सावधगिरीचे उपाय योजले पाहिजेत व लोकसंख्येवर नियंत्रण आनले पाहिजे.लोकसंख्यावाढीमुळे भारतासह जगात केव्हाही महाप्रलय येवु शकतो हे सरकारने व जनतेने लक्षात ठेवले पाहिजे.जगातील लोकसंख्या अशाच वेगवान गतीने वाढत रहाली तर मानवाच्या उष्णतेमुळे आणि अतीरेकामुळे शिखरातील बर्फ आपोआप वितळायला सुरूवात होईल व समुद्राची पातळी आपोआप वाढत जाईल याला नाकारता येत नाही.त्यामुळे लोकसंख्येच्या बाबतीत सावधान होने गरजेचे आहे.केंद्र सरकार, राज्य सरकार व पक्ष-विपक्षाचे राजकीय पुढारी यांना आग्रह करतो की लोकसंख्या नियंत्रणासाठी सर्वोतोपरी कठोर पाऊल उचलण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून जगातील प्रत्येक देशांनी आजच्या घडीला वृक्षारोपण करून करोडो झाडे लावण्याचा संकल्प करावा.