तमाशा…धर्म आणि राजकारणाचा – अरुण निकम

84

“तमाशा…धर्म आणि राजकारणाचा. “

जणु प्रश्नच उरले नाही ह्या खंडप्राय देशात, 

धर्म आणि राजकारणा व्यतिरिक्त, 

प्रसार माध्यमं अन दूरदर्शनवर, 

 त्याचीच दिन रात चर्चा असते, 

मी खरा, तो खोटा ह्यावर ,

खडाजंगी होतांना दिसते.! 

 

महागाईने तोंडातला, घास पळवलाय,

नाही शरम कुणाला, 

शेतकरी कर्जाने बेजार होऊन, 

आत्महत्या करतोय, 

नाही चाड कुणाला, 

शिक्षणात धर्माने उडी घेतलीय,

नाही भान कुणाला, 

धार्मिक स्थळांचे वाद पेटलेत ,

नाही कदर कुणाला,

देश एकसंघ राहील का, 

नाही गांभीर्य कुणाला.!

 

सत्ताधारी आणि विरोधक,

व्यस्त आहेत,

एकमेकांचे वाभाडे काढण्यात, 

कुरघोडी करण्यात, 

सत्ता खेचण्यात, अन सत्तेवर बसण्यात, 

मेलेले मुडदे उकरून, 

त्यावर पोळी भाजून घेण्यात.!

 

सर्वच ह्या मातीची लेकरे असती, 

आपल्या राजकिय फायद्या पायी, 

त्यांच्यात आप पर, भाव का निर्मीती, 

हरेक धर्म जनकल्याणार्थ, मार्गक्रमण करतो, 

त्यात वैरभाव, कपट कारस्थान,

कुरघोडीला वाव नसतो,

विध्वंस, दंगल, इतर धर्माप्रती 

द्वेष, ह्यांना थारा नसतो.!

 

धर्म आणि राजकारण, 

दोन्हींच्या वाटा असती परस्पर भिन्न, 

त्यांची सरमिसळ केल्यास, 

परिस्थिती उद्भवते, करणारी मन सुन्न, 

स्वार्थापायी माणसा माणसात

अविश्वास, संशय, तिरस्कार भरल्याने, 

जीव कमालीचा, होई खिन्न.!

 

जीव कमालीचा, होई खिन्न.!!

जीव कमालीचा, होई खिन्न.!!!

 

अरुण निकम

मो: 9323249487