15 जुलै रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
✍️स्वीटी गेडाम ✍️
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
मो. 7498051230
चंद्रपूर, दि.11 जुलै : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडल करीअर सेंटरआणि विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने 15 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथे करण्यात आले आहे.
10 वी, 12 वी, आय.टी.आय., पदविका, पदवी इत्यादी बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने, राज्यांतील नामांकीत उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या दृष्टीने, सदर रोजगार मेळावा आयोजित आहे
या मेळाव्यामध्ये विविध नामांकित कंपन्या सहभागी होत आहे. यात ओमॅट प्रा.लि. चंद्रपुर यांचे बॉइलर ऑपरेटर, केमिस्ट, फिटर, वेल्डर, फिल्ड ऑपरेटर, इलेक्ट्रिशिअन, वेलफेअर ऑफिसर, ट्रेनि इत्यादी, मल्टी ऑरगॅनिक प्रा.लि.चंद्रपूर हेल्पर, फिटर, वेल्डर, के. एल. गृप, हैद्राबाद, यांचे वेअर हाऊस असोसिएट, सेक्युरिटी गार्ड, महाराष्ट्र कार्बन प्रा.लि. चंद्रपूर यांचे ट्रेनि, विदर्भ क्लिक । सोल्युशन, चंद्रपूर यांचे फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशिअन, सनफायर प्रा.लि. चंद्रपूर यांचे फायरमॅन, भावन एनजी प्रा. लि. चंद्रपूर यांचे मॅनेजर जे.पि.असोसिएट अॅन्ड लॅबोरेटरीज प्रा.लि. चंद्रपूर यांचे एमएससी केमिस्ट, एस.बी.आय. लाईफ इंन्सूरन्स चंद्रपूर, यांचे फिल्ड वर्कर, डेक्सॉन इंजिनिअरींग प्रा.लि. नागपूर, यांचे मोटार मॅकेनिकल, इलेक्ट्रिशिअन, डिझेल मॅकेनिकल, वैभव इंटरप्रायझेस, नागपूर यांचे आय. टी. आय विद्यार्थ्यांकरीता मॅकेनिकल, संसुर सृष्टी प्रा.लि. चंद्रपूर यांचे बॅच मॅनेजर, फिल्ड एक्झुकेटीव्ह इत्यादी कंपन्याचे विविध पदे असल्याचे उद्योजकाकडुन कळविण्यात आलेले आहे.
मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे झेराक्स प्रतीसह (कमीत कमी तीन प्रती) उपस्थित राहावे. मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरीता https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करावी. भरती इच्छुक नियोक्ते यांनी जास्तीत जास्त रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर अधिसूचीत करावी. नोकरी इच्छुक उमेदवारांनी सदर वेबपोर्टलवर नोंदणी करावी तसेच लॉगीन करून शैक्षणिक पात्रतेनुसार अप्लाय करावा. अधिक माहीतीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर दुरध्वनी क्रमांक ०७१७२- २५२२९५ येथे संपर्क करावा.
जिल्हातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी होण्याचे व मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त अ.ला. तडवी यांनी केले आहे.