गुरुपौर्णिमेनिमित्त पोलादपूर तालुक्यात ‘गुरु सन्मान सोहळा’ संपन्न
सिद्धेश पवार
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
8482851532
पोलादपूर :- पोलादपूर गुरुपौर्णिमा हे आपल्या अध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरेतील एक महत्त्वाचे पर्व मानले जाते. याच औचित्य साधून पोलादपूर तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा ‘गुरु सन्मान सोहळा’ नुकताच उत्साहात पार पडला.
या उपक्रमाच्या प्रेरणास्त्रोत ठरले आहेत देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सन्मा. श्री. रवींद्र चव्हाण साहेब, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. धैर्यशील दादा पाटील व आमदार सन्मा. प्रविणभाऊ दरेकर. त्यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील आध्यात्मिक, सामाजिक, क्रीडा आणि पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान त्यांच्या निवासस्थानी जाऊन करण्यात आला.
या सन्मान सोहळ्यांत ह. भ. प. गुरुवर्य रामदादा महाराज घाडगे, ह. भ. प. गुरुवर्य रघुनाथ महाराज मोरे, ह. भ. प. गुरुवर्य गणपत महाराज मोरणकर, ह. भ. प. पांडुरंग महाराज जाधव, ह. भ. प. रवींद्र सोमोंशी सर, श्री. किसन सुरवंसे सर, श्री. सुखदेव मोरे सर व श्री. सुभाष अधिकारी साहेब या मान्यवर व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी भाजपच्या वतीने तालुका अध्यक्ष श्री. वैभव चांदे, माजी अध्यक्ष श्री. तुकाराम केसरकर, श्री. राजेश सकपाळ, श्री. निवृत्ती उतेकर, श्री. अजित कंक, श्री. समीर सुतार, श्री. महेश निकम, श्री. गिरिधर दरेकर, श्री. आशुतोष दरेकर, श्री. कृष्णा सणस, श्री. निलेश मोरे, श्री. विजय दरेकर सर, श्री. संदीप सकपाळ आदी कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला.
या उपक्रमातून ‘गुरु’ या संकल्पनेला सामाजिक स्तरावर अधिक व्यापक मान्यता देत, आदर्श व्यक्तिमत्त्वांचा गौरव करत समाजातील सकारात्मक ऊर्जा वृद्धिंगत करण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला.