*भूमिपुत्र संघर्षवाहिनी च्या वतीने युवा संवाद बैठक संपन्न*

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
वर्धा, आजनसरा. दिनांक १० ऑगष्ट
वर्धा जिल्ह्यातील आजनसरा येथे भूमिपुत्र संघर्षवाहिनी च्या वतीने युवा संवाद बैठक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत फाळके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी भूमिपुत्र संघर्षवाहिनी चे जिल्हाध्यक्ष योगेशजी घोगरे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन घोडे, जिल्हा उप कार्याध्यक्ष डॉ. कपिल मून, विर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष निरज बूटे, देवा अरगुडे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आजुबाजुच्या विविध गावातून आलेल्या तरुण युवकांशी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत फाळके पाटील यांनी दिलखुलास चर्चा केली. यावेळी युवकांनी राजकारणात येवून परिवर्तन घडविले पाहिजे असा संवाद बैठकीतून सूर निघाला. तसेच त्यांच्या समस्या समजून घेत त्या निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वस्त केले.