क्रांतीदिनी स्वतंत्र्य विदर्भाचे आंदोलन पेटले.

✒युवराज मेश्राम✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9527526914
नागपूर:- मागिल अनेक वर्षा पासून विदर्भावर अन्याय सुरु असुन वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने अनेक पद्धतीने वेगवेगळे आंदोलन करण्यात येत आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणुन मंगळवारी सकाळी वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आंदोलनाला सुरवात झाली त्या आंदोलनाला पोलिसांनी उधळून लावल्यानंतरही आंदोलकर्त्यांचा निर्धार कायम राहिला व त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत कूच केले. हे आंदोलन उद्या बुधवारी सकाळी 10 वा. पुन्हा होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
क्रांतीदिनानिमित्त विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संयोजक राम नेवले व माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वात शहीद चौकात ठिय्या आंदोलन मंगळवारी सकाळी करण्यात आले. यावेळी विदर्भाच्या विविध भागातून आलेले कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आंदोलनाला प्रारंभ झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेणे सुरू केले. यावेळी तेथे गोंधळाची स्थिाती निर्माण झाली होती. सुमारे 50 आंदोलनकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर या आंदोलकांनी पुन्हा प्रचंड घोषणाबाजी करीत शहीद चौकाकडे कूच केले. उद्या बुधवारी सकाळी पुन्हा 10 वाजता आंदोलनाला सुरूवात होईल असे सांगण्यात आले आहे.