शेतकरी भावांना पीकविमा मिळाला नाही तर शासकीय कार्यालये फोडू, बुलडाण्यात मनसेचा इशारा.
✒️मुकेश चौधरी✒️
उप संपादक मिडिया वार्ता न्युज
बुलडाणा,दि.11 ऑगस्ट:- आज शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात आहे. त्यात शासन आणि विमा कंपन्या शेतक-याना मोठ्या प्रमाणात लूटण्यात लागल्याचे चित्र सर्वीकडे दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांपासून बहुसंख्य शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम मिळाली नसून आता जर सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर करून तात्काळ पीक विमा मंजूर केला नाही तर राज्यातील शासकीय कार्यालये फोडू असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड यांनी आज बुलढाण्यात दिला. आज बुलढाणा जिल्हा मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीकविमा व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी सोयाबीन रोपांचे हार गळ्यात घालून सरकार व पीकविमा कंपन्यांविरुद्ध घोषणाबाजी केली.
महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्हात आणि बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील संकटं अजिबात थांबतांना दिसत नाहीयेत. मोठंटल मोठ्या संकटाला दोन हात करत शेतकरी मोठ्या हिमतीने उभं राहण्याचा प्रयत्न करतोय. मात्र निसर्ग पुन्हा पुन्हा शेतकऱ्यांची परीक्षा घेतांना दिसतोय. बुलडाणा जिल्ह्यात गेल्या तीन चार वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना नापिकीला सामोरे जावे लागत आहे, आणि दीड दोन वर्षांपासून कोरोनामुळे तर सर्वकाही ठप्प असल्याने याचा आर्थिकदृष्ट्या मोठा परिणाम शेतकऱ्यांवर झालाय. शेतकऱ्याने खाजगी कर्ज काढून शेतीची मशागत करून पेरणीची तयारी केली होती. खरिपाच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाला त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील जवळपास 94 टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली. जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते आणि हे पीक शेतकऱ्यांच्या दृष्टीने नगदी पीक समजले जाते. जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत 3 लाख 55 हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. मात्र आता पावसाने दडी मारल्याने अनेक पिकांवर अनेक रोग पडलेत. त्यामुळे उत्पन्न खर्च वाढल्याने शेतकरी हवालदिल झालाय. गेल्यावर्षीचा पीकविमा सरकारने अजूनही दिला नाही. शेतकरी पूर्णतः संकटात सापडला असल्याने आज सिंदखेडराजा तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत त्यांनी काल सिंदखेडराजा शहरात केंद्र व राज्य सरकारची प्रतिकात्मक वरात काढत तहसील कार्यालयात लग्न लावलं होतं.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 2020 चा पिक विमा व अतिवृष्टीची नुकसान भरपाई यांच्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने काल अनोखे आंदोलन करण्यात आलं. राजे लखुजी जाधव यांच्या राजवाडा समोरून बँड वाजवत राज्य व केंद्र सरकारची प्रतिकात्मक वरात काढली. ही वरात संपूर्ण शहरातून मिरवणूक काढून तहसील कार्यालयाच्या आवारात केंद्र सरकार व राज्य सरकारचे लग्न लावण्यात आलं.