पहिली घंटा वाजविण्यासाठी रंगकर्मी उतरले रस्त्यावर ऑगस्ट क्रांतिदिनी कलावंताचा उठाव.

युवराज मेश्राम✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9527526914
नागपूर :- कोरोना वायरस महामारीमुळे तब्बल दीड वर्षापासून कोरोना निर्बंध झेलत असलेल्या सांस्कृतिक क्षेत्रातील कलावंतांनी, सोमवारी ऑगस्ट क्रांतिदिनी रंगमंचावरील पहिली घंटा वाजविण्यासाठी शांततापूर्वक एल्गार पुकारला आणि आंदोलन केल. यावेळी कलावंतांना त्यांचे रंगमंचावर कार्य करू देण्याची मागणी करण्यात आली.

माघील वर्षा पासून बंद असलेले रंगमचाचे कामामुळे दोन महिन्यापूर्वी नाशिक येथून सुरू झालेले रंगमचकर्मीयाचे आंदोलनाचे लोण मुंबईमार्गे राज्यभरात पसरत आहे. त्याच अनुषंगाने ऑगस्ट क्रांतिदिनी शासनापुढे आपल्या वेदना मांडण्याचा निर्धार करण्यात आला. सोमवारी राज्यभरात एकाचवेळी हे आंदोलन हजारो रंगकर्मींनी पुकारले. यात नाट्य कलावंत, चित्रकार, गायक, नर्तक, कीर्तनकार, भजनगायक, वादक आदींसह लोककलावंतांचा सहभाग होता. नागपुरात संविधान चौकात हजाराेंच्या संख्येने रंगकर्मी एकवटले होते. विशेष म्हणजे, रंगमंचावर नऊ रसांचे सादरीकरण करणारे कलावंत यावेळी मनात चीड असली तरी शांत रसाने रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनाचे नेतृत्व कोण्या एका संघटनेने किंवा कोण्या सांस्कृतिक नेत्याने नव्हे तर एकीने सर्व रंगकर्मींनी केले. आंदोलनानंतर निवडक नेतृत्वांनी जिल्हाधिकाऱ्यांना नाट्यगृह, सिनेमागृहासकट सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले.