महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रकल्प यशस्वीरित्या राबवून तो राज्यात लागू करु : गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई

✍️मनोज खोब्रागडे✍️
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961

सातारा : – शिक्षणाच्या माध्यमातून मुलींच्या-स्वसंरक्षणासाठी सातारा जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील प्रकल्प यशस्वीरित्या राबवून तो संपूर्ण राज्यात लागू करण्याचा मनोदय गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

महिला स्वसंरक्षण कौशल्य विकास प्रशिक्षण प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबतची बेठक आज गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस पोलीस अधिक्षक अजय कुमार बन्सल, सह संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण पुणे विभाग अनिल गावित, उपायुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पुणे विभाग श्रीमती अनुपमा पवार, सहायक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सचिन जाधव,जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक आदि उपस्थित होते.

या योजने अंतर्गत समाजातील 15 ते 45 या वयोगटातील महिलांना स्वसंरक्षाणार्थ प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शासनामार्फत गृह, क्रीडा, शिक्षण तसेच कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांची नेमणूक करुन मुलींना व महिलांना प्रॅक्टिकल व थेअरीच्या माध्यमातून स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येणार आहेत.

या प्रशिक्षणामुळे मुली, युवती , महिलांना दैनंदिन जीवनात सामारे जावे लागणाऱ्या लैंगिक हल्ले, अपहरण, शोषण, गुडगिरी इत्यादी पासून स्वसंरक्षण करता येईल. महिलांवर होणारे हल्ले, छळवणूकीचे प्रकार, महिला हिंसाचाराचे प्राकार रोखता येतील. तसेच शालेय जिवनापासून मुलींमध्ये कौशल्य प्रशिक्षणाची आवड निर्माण करुन कौशल्यवृध्दी करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here