हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत सावलीत तिरंगा सन्मान रॅलीचे आयोजन

हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत सावलीत तिरंगा सन्मान रॅलीचे आयोजन

हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत सावलीत तिरंगा सन्मान रॅलीचे आयोजन

बाबा मेश्राम
सावली तालुका प्रतिनिधी
7363907273

सावली : – भारत देशाला स्वातंत्र्य मिळुन ७५ वर्ष झाल्याबद्दल आपण ‘ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष’ म्हणून अवघ्या देशभरात मोठ्या उत्साहाने साजरे करत आहोत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी न.प. सावलीच्या वतीने दि.08/08/2022 पासून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्याचाच एक भाग म्हणून नगर पंचायत सावली , पंचायत समिती सावली , तहसील कार्यालय सावली आणी पोलीस स्टेशन सावली यांचा संयुंक्त विद्यमानाने ( दि. 10 जुलै) तिरंगा सन्मान बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले

सावली नगर पंचायत तर्फे ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा भाग म्हणून प्रत्येकाने दि .13 आगस्त ते 15 आगस्त पर्यंत तिरंगा ध्वज , आपल्या घरावर लावावा व ध्वज संहीताचे पालन करावे ,यासाठी घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येत आहे तसेच रैली द्वारे लोकांना माहिती दिली जात आहे,अभियान आता वेगात सुरू आहे.
या अभियानानिमित्त सावली शहरात जनजागृती निमीत्त बाईक रँलीचे आयोजन करण्यात आलेले होते.
सावली शहरातील सर्व नागरिकांना घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. या वेळी सावलीचे तहसीलदार .परीक्षित पाटील , नायब तहसीलदार सागर कांबळे , पंचायत समिती सावली च्या बिडिओ सुनिता मरस्कोल्हे मॅडम , नगरपंचायत सावलीच्या नगराध्यक्षा सौ. लताताई लाकडे , उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकर तसेच नगरसेवक,सतीश बोम्मावार,.विजय मुत्यालवार सचिन संगीडवार,,नितेश रस्से,.अंतबोध बोरकर. प्रीतम गेडाम, गुणवंत सुरमवार. प्रफुल वाळके, नगरसेविका.साधना वाढई,अंजली देवगडे, ज्योती शिंदे,.राधा ताटकोंडवार, .नीलम सुरमवार ,सौ.गुरुनले प्रियांका रामटेक.ज्योती गेडाम आणी पंचायत समिती सावली , तहसील कार्यालय , नगर पंचायत सावली व पोलीस स्टेशन सावली चे सर्व अधिकारी,कर्मचारी ,सोबतच सावली शहरातील नागरिकांनी या वेळी मोठ्या प्रमाणात आपली उपस्थिती दाखवत “हर घर तिरंगा ” या उपक्रमाला अधिक बळकटी दिली.