तिसर्या मुंबई साठी नवनगर विकास प्राधिकारणचे पुनर्जीवन शिंदे फडणवीस सरकार ने करावे.
शहानवाज मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो.7972420502
दि:10/08/2022
रोहा: फडणवीस सरकारने दि.१९/०१/२०१९ रोजी एक अधिसुचना प्रसिध्द करुन अलिबाग,रोहे,मुरुड तालुक्याच्या ग्रामीण परिसरातील १३४०९ हेक्टर्स जमिनीवर नगरासह ‘एकात्मिक औद्योगिक क्षेत्र उभारण्याचे घोषित केले होते.
त्यासाठी वैधानिक अस्तित्व असणारे न.वि.प्राधिकारणही स्थापन करुन सिडको मार्फत जमिनी संपादन करण्याचे संबंधितांना लेखी कळविले होते.या प्रकल्पामुळे मुंबई, नवीमुंबईच्या पायाभुत सुविधांवर पडणारा ताण कमी करणे हा फडणवीस सरकार चा हेतु होता. पण सन २०१९ नंतर झालेल्या सत्तांतरामुळे नवीन आलेल्या ठाकरे सरकारने दि. ०८/१०/२०२० नवी अधिसुचना प्रसिद्ध करुन या न.वि. प्राधिकारणासह सारी योजनाच रद्द केली.परिणामी ठाकरे सरकार विरुद्ध स्थानिक कार्यकर्त्यांनी श्री.प्रकाश विचारे पुढाकाराने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
आता पुन्हा फडणवीस साहेबांच्या पुढाकाराने शिंदे सरकार विराजमान झाली आहे .तेव्हा शिंदे-फडणवीस सरकारने दि. १९/०१/२०१९ रोजीच्या ठाकरे सरकारने रद्दबातल केलेल्या आपल्या अधिसुचनेचे ‘ पुनर्जीवन ‘ करुन न.वि.प्राधिकारणासह अधिसुचनेचेही पुनर्जीवन करुन न्यायालयीन वाद मिटवावा व ठाकरे सरकारने येथील सामान्यांवर केलेला अन्याय दुर करावा अशी मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे केली आहे.
तरी तिसऱ्या मुंबई साठी नवनगर विकास प्राधिकरणचे पुनर्जीवन शिंदे फडणवीस सरकार ने करावे आशी मागणी होत आहे.