भंडारा जिल्हातील मौदा येथे छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या मूर्तीची विटंबना

51

भंडारा जिल्हातील मौदा येथे छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या मूर्तीची विटंबना

मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर तात्काळ कारवाई करण्यात यावी व नागरिकांना शांततेत राहण्याचे आव्हान सर्व पक्षाच्या वतीने करण्यात आले.

भंडारा (मौदा):- येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची काही समाज कटकांनी विटंबना केल्याचे आढळून आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारताचे आराध्य दैवत असून त्याच्या प्रतेमेची झालेली विटंबना हा फार क्लेशदायक विषय आहे. समस्त शिवप्रेमी बांधवाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या समाज कंटकांना शोधून त्यांच्या वर कारवाई न झाल्यास मोठ्या प्रमाणात जनतेचा रोष रस्त्यावर दिसून येईल व कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची दाट शक्यता आहे. असे सर्व पक्षीय निवेदन आज तहसीलदार मौदा यांना देण्यात आले..
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या विटंबना झाल्या मूळे सर्व शिवप्रेमी व नगरवाशियाना शांत राहण्याचे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले व राष्ट्रवादी जिल्हाद्यक्ष शिवराज गुजर यांनी केले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले, राष्ट्रवादी जिल्हाद्यक्ष शिवराज गुजर, नगरसेवक मुन्ना चलसानी, युवासेना शहरप्रमुख जितू साठवणे, तालुकाप्रमुख नितेश वांगे, मिर्झा आरिफ बेग, रमेश कुंभलकर, चेतन गोडबोले, ईश्वर डहाके, प्रकाश शंभरकर, संजय पसेरकर, दिपाशु फंदी, निकिलेश जौजालकर, अनिकेत झोड, शुभम जुमळे, स्वप्नील भोयर व समस्त शिवप्रेमी व सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.