वडणेर येथील शॉट सर्किट मुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेला आग

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
हिंगणघाट:- तालुक्यातील वडणेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात उभ्या असलेल्या रुग्णसेविकाला शॉट सर्किट मुळे लागली आग , दि 10 सप्टेंबर रात्री पावडे आठ वाजता सुमारास उघडीस आली, आहे ,या आगिने पाहता पाहता रौद्र रूप धारण केले आहे , ग्रामीण रुग्णालयात थांबून असलेली रुग्णसेविका ला लागली आग , गाडी ड्रायव्हर चा मित्र हा रूम मध्ये आराम करत होता, त्याचा मोबाईल गाडी मध्ये होता तो आणण्यासाठी बाहेर आला गेट खोलताच त्याला आग दिसली, आग दिसताच त्यांनी गाडी मालक यांना बोलावणं ,आगीची घटना स्थानिक नागरिकांना समजताच नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण एवढी आग होती, रौद्र रूप धारण करून आगीने रुग्णवाहिकेला आपल्या कवेत घेतले आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हिंगणघाट येथील अग्निशमनला बोलावून आग विझवण्यास यश आलं. घटनास्थळी वडणेर पोलीस स्टेशन माहिती मिळताच वडणेर पोलिस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र शेट्टे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पियसआय सोनपीतले, बागडे पियसआय पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहे.