अमरावती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी 16 जणांचे वाचविले प्राण, 100 व्यक्तिंना सुरक्षित स्थळी हलविले

52

अमरावती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी 16 जणांचे वाचविले प्राण, 100 व्यक्तिंना सुरक्षित स्थळी हलविले

अमरावती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली माहिती

अमरावती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी 16 जणांचे वाचविले प्राण, 100 व्यक्तिंना सुरक्षित स्थळी हलविले
अमरावती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी 16 जणांचे वाचविले प्राण, 100 व्यक्तिंना सुरक्षित स्थळी हलविले

✍️मनोज खोब्रागडे✍️
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961

अमरावती : – जिल्‍हयात पाऊस व पूरस्थितीमुळे विविध ठिकाणी अडकलेल्या 16 व्यक्तिंना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी तातडीने पोहोचून सुखरुप बाहेर काढले, तसेच बडनेरा येथील 100 व्यक्तिंना सुरक्षित स्थळी हलविले.

शहरातील बडनेरा व इतर भागात पावसाचे पाणी शिरले असता, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी मौजा बडनेरा येथे पावसाच्या पाण्यात अडकलेल्या 100 व्यक्तींना सुखरुप बाहेर काढले. बडनेरा येथील झरी मंदीरात या सर्वांना स्थलांतरीत करण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती कक्षाने आज दिली.

जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे व सर्व संबंधित महसुल अधिकारी, पोलीस, सीआरपीएफ जवान यांच्या समन्वयातून मोहिम राबवण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे सुरेंद्र रामेकर यांनी दिली.

तिवसा तालुक्यातील मौजा भिवापूर येथील तलावात 6 युवक अडकले होते. या 6 युवकांना आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या चमुने बाहेर काढले. मौजा शिवणगाव येथे नदीला पुर आल्यामुळे तेथील 30 लोक शिवणगाव येथे जाऊ शकले नाही, त्याकारणाने प्रशासनाने त्यांची फत्तेपुर येथील समाज मंदीरात राहण्याची व्यवस्था केली. तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर येथील वर्धा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे कुऱ्हा ते आर्वी या पुलावरुन पाणी जात असल्यामुळे या मार्गावरील वाहतुक सध्या बंद करण्यात आली आहे.

भातकुली तालुक्यातील इब्राहिमपुर, बहादरपुर, दाढी, पेढी या गावांतील नाला रस्त्यावरुन वाहत असल्याने यादरम्यान गावाशी संपर्क तुटला होता. बहादरपुर येथे जाण्यासाठी निघालेल्या 9 नागरिकांना पुलावरुन पाणी वाहत असल्याने अलिकडच्या खरबी या गावातील जिल्हा परिषद परिसरात निवारा देण्यात आला. आता तेथील परिस्थिती सामान्य झाली असल्याची माहीती आहे.

चांदूर रेल्वे तालुक्यातील चांदूर-राजुरा रस्त्यावरुन दोन नाल्याच्या प्रवाहामध्ये 8 इसम अडकले होते व येथील त्रिवेणी संगम एकपाला मंदीरात 3 अडकलेल्या व्यक्तींना आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले. अमरावती तालुक्यातील रोहणखेडा, पर्वतापुर, शेवती या गावाचा पावसामुळे संपर्क तुटला होता. तिवसा येथील मोजा ठाणाठुणी गावातील काही घरांमध्ये पाणी शिरले आणि येथील शिवणगांवच्या सुर्यगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गावाचा संपर्क तुटला होता. परंतु आता तेथील परिस्थिती सामान्य झालेली आहे. मोजा जहागीरपुर येथील काही घरांमध्ये पाणी शिरले त्याबाबत पंचनामे सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.

बचाव पथकांपैकी एका पथकात

देवानंद भुजाडे,कौस्तुभ वैद्य, भूषण वैद्य, गजानन वाडेकर, हिरालाल पवार, पंकज येवले, अजय आसोले, महेश मांदाळे, राजेंद्र शहाकार, राजू देवरे (चालक), प्रमोद सरवरे (चालक) यांचा, तर दुसऱ्या पथकात दिपक डोरस (टीम लीडर) दिपक पाल, सचिन धरंमकर, उदय मोरे, आकाश निमकर, गौरव जगताप, गणेश जाधव, प्रफुल भुसारी यांचा समावेश होता.