राष्ट्रीय महामार्गावरिल खड्डे ठरत आहे जीवघेणे मागून येणाऱ्या ट्रकची ट्रकला धड़क चालक जखमी, ट्रकचे मोठे नुकसान.

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
हिंगणघाट;- वरून नागपुर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील वडनेर नजीक मोठाले खड्डे पडल्याने दर दिवशी अपघात घडत आहे. दिनांक ११ रोजी नजीकच्या दारोडा घाटसावली जवळ ट्रकने ट्रक ला जबर धडक दिल्याने अपघात घडला. हि घटना आज सकाळी सुमारे ९ च्या दरम्यान घडली. हिंगणघाट तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरिल दारोडा घाटसावली जवळ मोठे खड्डे असल्यामुळे ट्रक अनियंत्रित होऊन पुढील ट्रक वर धड़कला. दारोडा नजीकच्या उडाण पुलाच्या जवळ हैद्राबाद वरून येत असलेला ट्रक क्रमांक RJ 0 2 GB 8122. . UK06 7178 या दुसरा ट्रक नियंत्रण होऊन। पहिला ट्रक ला धडकला या ट्रक वर मागून धडक दिली, ट्रक चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ,ट्रक चालकास गंभीर मार लागला , यामुळे वाहतूक जाम होऊन दोन किलो मीटर अंतर पर्यन्त वाहनाच्या रांगा लागल्या . घटनास्थळी वडनेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सोनपीतले यांनी घटनास्थळी पाहणी करून वाहतुक पूर्ववत सुरु केली. अपघाताचे कारण रोड वर खड्डे असल्यामुळे हा अपघात झाला असे म्हनणे आहे. या ठिकाणी 8 वेळा मोठे मोठे अपघात झाले तरी प्रशांशन मात्र लक्ष देत नसल्याने प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे ,पुढील तपास ठाणेदार राजेंद्र शेट्टे यांच्या मागदर्शनात पुढील तपास वडनेर पोलीस स्टेशन चे PSI सोंन पितले, बागडे, पुढील तपास करीत आहे.