चंद्रपूर जिल्ह्यात सतत होत असलेल्या अतिव्रुष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करा – राजू झोडे

51

चंद्रपूर जिल्ह्यात सतत होत असलेल्या अतिव्रुष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करा – राजू झोडे
जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन राजु झोडे यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची केली मागणी.

चंद्रपूर जिल्ह्यात सतत होत असलेल्या अतिव्रुष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करा - राजू झोडे
चंद्रपूर जिल्ह्यात सतत होत असलेल्या अतिव्रुष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करा – राजू झोडे

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर 
मो 9764269694

चंद्रपूर :- जिल्ह्यात सतत होत असलेल्या अतिव्रुष्टीमुळे शेतकर्यांचे व सर्वसामान्य नाकरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.सततच्या पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असुन येथिल शेतकरी हवालदिल झाला आहे. नदिकाठावरिल उभी पिके वाहुन गेली तसेच ग्रामिण भागातील घरांची पडझड होऊन मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे पुरस्थितीचा सामना करावा लागत आहे. नदिकाठच्या गावांना याचा मोठा फटका बसत असुन नागरिकांना दररोज याचा सामना करावा लागत आहे. उभी शेतपिके खराब होत असुन यावर्षी उत्पन्न खर्चापेक्षा कमी उत्पन्न होण्याची शक्यता आहे.अशा परिस्थीतीत जिल्ह्यातील एकंदर परिस्थीतीचा आढावा घेऊन ग्रामिण शेतकरी जनतेला प्रशासकीय स्तरावरुन दिलासा देण्यात यावा व चंद्रपूर जिल्हाला ओला दुष्काळ जाहीर करुन आर्थिक संकटापासुन वाचवावे . करिता उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजु झोडे यांनी मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली. त्याच्यासोबत शेतकरी कवडु कोसनकर, निखिल लाडांगे, चेतन पावडे, भूषण पेटकर, अनिल दहेगांवकर, अनुरूप पाटिल, निरजंने वालके, पंचशिल तामगाडगे आदि कार्यकर्ता उपस्थित होतों.