कोडसेलगुडमला पेसाचा दर्जा द्या; संतोष ताटीकोंडावार यांचे पालकमंत्र्यांना साकडे

49

कोडसेलगुडमला पेसाचा दर्जा द्या; संतोष ताटीकोंडावार यांचे पालकमंत्र्यांना साकडे

कोडसेलगुडमला पेसाचा दर्जा द्या; संतोष ताटीकोंडावार यांचे पालकमंत्र्यांना साकडे
कोडसेलगुडमला पेसाचा दर्जा द्या; संतोष ताटीकोंडावार यांचे पालकमंत्र्यांना साकडे

संतोष सल्लावार ✒
अहेरी शहर प्रतिनिधी
8390031122
अहेरी;- तालुक्यातील अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणा-या कमलापूर ग्रामपंचायतीअंतर्गत येत असलेल्या कोडसेलगुड हे गाव आदिवासीबहूल आहे. या गावाला पेसा पेसा घोषित करण्याबाबत वरिष्ठ स्तरावर अनेकदा निवेदन सादर केले. मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष घालित सदर गावाला पेसाचा दर्जा द्यावा, अशी मागणी जनकल्याण समाजोन्नत्ती अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.

ताटीकोंडावार यांनी म्हटले आहे की, कमलापूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कोडसेलगुडम येथे 80 घरे असून लोकसंख्या 500 च्या घरात आहे. येथील 95 टक्के नागरीक आदिवासी आहेत. त्यामुळे या गावाला पेसा गावाचा दर्जा देण्यात यावा यासाठी सातत्याने मागणी होत आहे. 12 जुलै 2016 रोजी उपविभागीय समितीकडे याबाबत प्रस्ताव सादर केले होते. मी स्वत: यासंदर्भात गटविकास अधिकारी, जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदन सादर करुन गावाला पेसाचा दर्जा देण्याची मागणी लावून धरली होती. मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्या जात आहे. त्यामुळे आदिवासी गाव असतांनाही आदिवासी विभागामार्फत देण्यात येणा-या विविध योजनांपासून सदर गाव वंचित आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी याकडे जातीने लक्ष घालून कोडसेलगुडमला पेसा गावाचा दर्जा देऊन आदिवासीबहूल नागरिकांना न्याय द्यावा, अन्यथा ग्रामस्थांना सोबतीला घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ताटीकोंडावार यांनी पत्रकातून दिला आहे.