विठ्ठलवाडा येथे घरात निघाला विषारी साप, सर्पमित्राणे केले सापाचे रेस्क्यू

47

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी:- पावसाळ्यात घरात साप आढळणे साहजिक बाब आहे. गोंडपीपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे भलावी यांच्या घरी विषारी साप आढळून आला. साप बघताच भलावी यांनी आरडाओरडा करत मुलांनासोबत घेत घरा बाहेर धाव घेतली. साप निघाल्याची माहिती तात्काळ विठ्ठलवाडा येथील सर्प मित्र टिकाराम डाहूले यांना दिली. विठ्ठलवाडा येथील सर्प मित्र टिकाराम डाहूले यांनी भलावी यांचे घर गाठून मोठ्या शिताफीने यांनी सापाचे रेस्क्यू केलं. पकडलेल्या सापाला आष्टी येथिल नजीकच्या नैसर्गिक अधिवासात खुल्या वनक्षेत्रात मुक्त केले.

गत काही वर्षांत नागरीकरण वाढत आहे. जंगलांचा आकार कमी होतो आहे. त्यामुळे मानवी वस्तीलगत साप आढळून येतात. साप हासुद्धा एक जीवच आहे. मात्र, पावसाळा सुरू होताच साप आढळण्याचे प्रमाण वाढते. अशावेळी साप आढळल्यास घाबरून न जाता सावधान होणे आवश्यक आहे. वेळीच सर्पमित्राला पाचारण करणे योग्य आहे.