नागपूर मेट्रोला विजय वडेट्टीवार यांचा धडक इशारा, अनुशेष न भरल्यास करण्यात येईल एफआयआर

✒️युवराज मेश्राम ✒️
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
95275 26914
नागपुर:- महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानी नागपूरात मेट्रोत रेल्वेत एस.सी, एस.टी, ओबीसी समाजाचे आरक्षण डावलून पदभरती घोटाळा प्रकरणी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आक्रमक झाले आहेत.

नागपूर मेट्रो रेल्वेमध्ये भरती करताना आरक्षण डावलल्याने ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार संतप्त झाले असून ‘बॅकलॉग भरा अन्यथा कारवाईस तयार राहा’, असा इशारा त्यांनी मेट्रो प्रशासनाला दिला आहे.

नागपूर मेट्रोनं ‘बॅकलॉग भरला नाही तर मुख्यमंत्र्यांशी बोलून एफआयआर दाखल करणार’ असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले. मंत्री विजय वडेट्टीवार यांचा नागपूर मेट्रोला इशारा देत या प्रश्नी मुख्यमंत्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घेणार घेणार असल्याचं म्हटलं आहे. ओबीसी, एससी, एनटींना डावलून ओपनच्या जास्त जागा भरल्या आहेत. ‘मंत्री असूनंही मेट्रो विरोधात मोठी भूमिका स्वीकारणार’ असल्याचा इशारा देखील विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. मेट्रो रेल्वे भरती घोटाळ्याची चौकशी करणार असल्याचंही ते म्हणाले. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यानी दिलेल्या इशाराचे समोर काय होते हे बघावे लागणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here