डीजे मालकावर धारदार शस्त्राने दाेघांनी केला वार

58

डीजे मालकावर धारदार शस्त्राने दाेघांनी केला वार

✍त्रिशा राऊत ✍

नागपूर ग्रामीण प्रतिनिधी  

मो 9096817953

डीजे मालकावर धारदार शस्त्राने दाेघांनी केला वार

नागपूर : डीजेचा मालक त्याच्या दाेन मित्रांसाेबत दुचाकीने जात असताना माेटरसायकलवर आलेल्या दाेघांनी त्यांना वाटेत अडविले.त्या दाेघांनी डीजे मालकावर धारदार शस्त्राने वार करताच त्याच्या मित्रांनी तिथून पळ काढला. या हल्ल्यात डीजे मालकाचा मृत्यू हाेताच हल्लेखाेर तिथून पळून गेले. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्हान-बाेर्डा मार्गावर शनिवारी (दि. १०) मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडली.

कल्पेश भगवान बावनकुळे (२८, रा. बनपुरी-साटक, ता. पारशिवनी) असे मृताचे नाव आहे. कल्पेश डीजेचा व्यवसाय करताे. त्याने शनिवारी नागपूर शहरातील ऑर्डर पूर्ण केल्यानंतर मित्र सूरज ढोबळे व जितेंद्र ढोबळे याच्यासाेबत एमएच-४९/बीएल-५६२८ क्रमांकाच्या ॲक्टिव्हाने नागपूरहून कन्हान मार्गे बनपुरीला जात हाेता.

तिघेही कन्हान-बाेर्डा मार्गावरील एका पेट्राेलपंपजवळ पाेहाेचताच माेटरसायकलवर आलेल्या अनाेळखी दाेघांनी त्या तिघांना अडवले. त्यामुळे तिघेही राेडवर काेसळले. त्या दाेघांनी काही कळण्याच्या आत कल्पेशला पकडून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करायला सुरुवात केली. भीतीमुळे सूरज व जितेंद्रने ॲक्टिव्हा साेडून तिथून लगेच पळ काढला. ताे खाली काेसळताच दाेघे पळून गेले. यात गंभीर व खाेलवर जखमा झाल्याने कल्पेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला.