प्रा.डॉ. राजन जयस्वाल यांच्या 'क्षितिज' या काव्यसंग्रहाचे 14 सष्टेबरला प्रकाशन.

प्रा.डॉ. राजन जयस्वाल यांच्या ‘क्षितिज’ या काव्यसंग्रहाचे 14 सष्टेबरला प्रकाशन.

 

अरुण रामुजी भोले

नागभिड तालुका प्रतिनिधी

9403321731

प्रा.डॉ. राजन जयस्वाल यांच्या ‘क्षितिज’ या काव्यसंग्रहाचे 14 सष्टेबरला प्रकाशन.

नागभिड— महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी व विदर्भातील पहिले चारोळीकार,नाट्य समीक्षक प्रा.डॉ. राजन जयस्वाल यांच्या ‘क्षितिज’ या अकराव्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आकांक्षा प्रकाशन व जयस्वाल परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 14 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.00 वाजता श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह राष्ट्रभाषा संकुल,शंकरनगर चौक,नागपूर येथे पार पडत आहेत.

या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ‘वनराई’ चे विस्वस्थ डॉ.गिरीश गांधी असणार आहेत तर ज्येष्ठ समीक्षक प्रा.श्रीकांत तिडके यांच्या शुभहस्ते प्रकाशन होणार आहे. या काव्यसंग्रहावर ज्येष्ठ कवी प्रा.डॉ. सुखदेव ढानके,समीक्षक प्रा.डॉ. कोमल ठाकरे हे भाष्य करणार आहेत.

या काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्याची विनंती अरुणा सबाने,संचालक आकांक्षा प्रकाशन,अभिषेक राजन जयस्वाल,अँड.अभिलाषा राजन जयस्वाल,आकांक्षा प्रकाशन व जयस्वाल परिवार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here