शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! राज्यात 'मुख्यमंत्री किसान योजना' सुरु शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाकाठी जमा होणार ६ हजार 

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! राज्यात ‘मुख्यमंत्री किसान योजना’ सुरु

शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाकाठी जमा होणार ६ हजार 

 अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

📱 883085735

 

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! राज्यात ‘मुख्यमंत्री किसान योजना’ सुरु
शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाकाठी जमा होणार ६ हजार

 मुंबई 10 सप्टेंबर- राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यांनतर अनेक महत्वपूर्ण निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतले आहे. सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आता राज्यातही ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. 

मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी पात्र शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल. सध्या देशपातळीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. त्याच धर्तीवर राज्यात देखील मुख्यमंत्री किसान सम्मान निधी योजना राबवण्यात येणार आहे. यानुसार प्रत्येक महिन्यात टप्प्या टप्प्यानं शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम दिली जाणार आहे. प्रत्येक वर्षी पात्र शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. कृषी विभागासोबतच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात याबाबतची तरतूद केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here