काम न करता जमा केलेल्या पैश्यासाठी तगादा लावणार्‍या रोजगार सेवकावर कार्यवाही करा:पत्रकार परिषदेत पुरूषोत्तम पेंदाम याची मागणी

काम न करता जमा केलेल्या पैश्यासाठी तगादा लावणार्‍या रोजगार सेवकावर कार्यवाही करा:पत्रकार परिषदेत पुरूषोत्तम पेंदाम याची मागणी

काम न करता जमा केलेल्या पैश्यासाठी तगादा लावणार्‍या रोजगार सेवकावर कार्यवाही करा:पत्रकार परिषदेत पुरूषोत्तम पेंदाम याची मागणी

✍️जितेंद्र नागदेवते ✍️
सिंदेवाही ग्रामीण प्रतिनिधी
88068909

सिंदेवाही :-सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत कळमगाव येथील रोजगार सेवकाने कामवर न बोलवता फक्त फोटो काढून खात्यात पैसे टाकुन ते पैसे काढून देण्यासाठी मानसिक त्रास देणार्‍या रोजगारसेवक वर कार्यवाही करण्याची मागणी पुरूषोत्तम पेंदाम यांनी पत्रकार परिषदेत केली .
सविस्तर वृत्त असे की ग्रामपंचायत कार्यालय कळमगाव येथील रोजगारसेवक कोमल गेडाम यांनी त्याच गावातील पुरुषोत्तम आत्माराम पेंदाम व ईतर नऊ जणांना कामावर न बोलवता शाळेच्या आवारात महिनाभर फोटो काढून खात्यात पैसे जमा केले.
पुरुषोत्तम पेंदाम हे वयाने म्हातारे व दोन्ही पायांनी अपंग तसेच गरीब असुन त्याचा खात्यात mrgs चे नावाने चार वेळा मिळुन सुमारे नऊ हजार रुपये जमा केले. पुरूषोत्तम पेंदाम हे अज्ञानी असल्याने कोणत्यातरी योजनाचे पैसे जमा झाले असावेत असे समजून खर्च केले. त्यानंतर येथील रोजगार सेवक कोमल गेडाम हे पुरुषोत्तम पेंदाम ह्यांच्याकडे रोजगार हमी योजनेचे पैसे काढून देण्यासाठी वारंवार तगादा लावला. रात्री अपरात्री त्याच्या घरी जाऊन पैश्याची मागणी करू लागल्याने व पैसे देत नसल्याने बदनाम करण्याचा प्रयत्न करीत मानसिक त्रास देत असल्याने त्याचा जाचातून मुक्त करण्याची मागणी पुरूषोत्तम पेंदाम यांनी पत्रकार परिषदेत केली.

पुरूषोत्तम पेंदाम यांनी सवंर्ग विकास अधिकारी तसेच जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या कडे रितसर तक्रार अर्ज सादर करून कारवाई करण्याची मागणी केली होती परंतु सवंर्ग विकास अधिकारी सिंदेवाही यांनी कोणतीही चौकशी न करता केराची टोपली दाखविली केली. अखेर
सदर तक्रार उपजिल्हाधिकारी यांनी मिळताच त्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले परंतु अजूनही कोणतीही कारवाई झालेली नसल्याचा आरोप पुरूषोत्तम पेंदाम यांनी केला आहे.येथील रोजगार सेवक कोमल गेडाम हा ग्रामपंचायतील कोणत्याही कामावर न बोलवता फक्त फोटो काढून लोकांच्या खात्यात पैसे जमा करुन मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार व अफरातफर करीत असुन त्यावर कार्यवाही करण्याची मागणी पुरूषोत्तम पेंदाम यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here