राज्य* *अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष 12 सप्टेंबर रोजी चंद्रपुरात*

21

*राज्य* *अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष 12 सप्टेंबर रोजी चंद्रपुरात*

✍️स्वीटी गेडाम ✍️
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
मो. 7498051230

*चंद्रपूर* , दि. 11 : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲङ धर्मपाल मेश्राम हे 12 सप्टेंबर 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

12 सप्टेंबर रोजी सोयीनुसार शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत चंद्रपूर महानगरपालिका येथील सभागृहात प्रलंबति प्रकरणे व अनुकंपा तत्वावरील प्रकरणे तसेच अनुसूचित जाती जमातीसाठी प्राप्त होणारा निधी बाबत आढावा व तपासणी, दुपारी 1 ते 2 राखीव, दुपारी 2 ते 4 पर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर येथे आर्थिक दुर्बल घटकावर केलेल्या खर्चाचा आढावा व कामाची तपासणी तसेच अनुसूचित जाती जमातीसाठी प्राप्त होणाऱ्या निधीबाबत आढावा व तपासणी.

दुपारी 4 ते 4.30 पर्यंत शासकीय विश्रामगृह येथे पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांच्यासोबत जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमाती ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत व गुन्ह्याबाबत आढावा बैठक, दुपारी 4.30 ते सायं 5 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्यासोबत आढावा बैठक, सायंकाळी 5 ते 6 पर्यंत महिला व बाल कल्याण अधिकारी जिल्हा परिषद व क्रीडा अधिकारी यांच्यासोबत आढावा, तसेच अनुसूचित जाती -जमाती यांच्यामार्फत मिळालेल्या निधीचा आढावा व तपासणी. सायीनुसार चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.