जनसुरक्षा विधेयक कायदा रद्द करण्याबाबत भिवंडीतील शिवसेना ठाकरे गटाकडून निदर्शने*

21

*जनसुरक्षा विधेयक कायदा रद्द करण्याबाबत भिवंडीतील शिवसेना ठाकरे गटाकडून निदर्शने*

अभिजीत सकपाळ
ठाणे ब्युरो चीफ
9960096076

भिवंडी: राज्य सरकारच्या माध्यमातून जनसुरक्षा विधेयक कायदा २०२४ लागू करण्यात आला होता मात्र हा कायदा लागू केल्यानंतर राज्यभरातून या कायद्याच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरु आहेत. भिवंडी शहरात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली होते, या प्रसंगी भिवंडी लोकसभा महिला आघाडी संपर्क संघटक आशा रसाळ, जिल्हाप्रमुख मनोज गगे, शहर प्रमुख प्रसाद कृष्णा पाटील, महानगरप्रमुख अरुण पाटील, जिल्हा संघटिका वैशाली मेस्त्री, जिल्हा सचिव राजाभाऊ पुण्यार्थी, शहर समन्वय नाना झळके, पश्चिम सचिव नितेश दांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात व्यापारी संघटना अध्यक्ष मनीष बंटी गिरी, कामगार सेना अध्यक्ष पप्पान शेख, उपशहर प्रमुख संतोष भावार्थी, भाई वनगे, गणेश मोरे, स्वप्निल जोशी, हर्षल राऊत, अनिस सिध्दिकी, विजय कुंभार, सुरेश पवार आदी शिवसैनिक व पदाधिकारी सहभागी झाले होते. तसेच शासनाने जनसुरक्षा विधेयक कायदा रद्द न केल्यास भिवंडी मध्ये अजून उग्र आंदोलन करण्यात येईल अशी माहीत शहर प्रमुख प्रसाद कृष्णा पाटील यांनी दिली